व्हिडिओ: स्टंपच्या पाठीमागे जाऊन त्याने चेंडू मारण्याचा केला प्रयत्न, परंतु झाले भलतेच

कोलंबो | श्रीलंकेचा क्रिकेटपटू चमारा सिल्वाने विश्वास बसणार नाही अशी गोष्ट क्रिकेटमध्ये केली आहे.त्याने क्रिकेटच्या इतिहासातील विश्वास बसणार नाही असा एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

त्याने यष्टींच्या मागे जाऊन चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला.परंतु या प्रयत्नात तो त्रिफळाचीत झाला.

हा विचित्र प्रकार पी सारा मैदानावर मेरीकॅन्टिले क्लबच्या एमआयएस ऊनीचेला विरुद्ध तीजय लंका सामन्यात झाला. ह्या व्हिडिओमध्ये असे स्पष्ट दिसत आहे की जेव्हा गोलदांज चेंडू टाकण्यासाठी मैदानावर धावला तेव्हा चमारा सिल्वा यष्टीच्या पाठीमागे धावत गेला. परंतु चेंडू टोलवणारा त्यापूर्वीच त्याने यष्टीचे वेध घेतले होते.

ह्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात क्रिकेटच्या खेळ भावनेच्या विरुद्ध वागल्याबद्दल त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दोन वर्षांची बंदी घातली होती. परंतु नंतर त्याला यातून सूट देण्यात आली होती.

चमारा सिल्वा श्रीलंकेकडून ११ कसोटी, ७५ वनडे आणि १६ टी२० सामने खेळला आहे.