Video: लसीथ मलिंगा बनला ऑफ स्पिनर, चक्क ३ विकेट्सही घेतल्या !

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आणि आपल्या यष्टीभेदी यॉर्कर्ससाठी क्रिकेट जगात सुप्रसिद्ध असलेल्या लसीथ मलिंगा आता ऑफ स्पिनर बनला आहे. श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्यात संधी न मिळालेला लसीथ मलिंगा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एमसीएच्या डिव्हिजन ए च्या नॉक आऊट सामन्यात यॉर्कर स्पेशालिस्ट मलिंगाने चक्क फिरकी गोलंदाजी केली आहे आणि एवढेच नाही तर त्याने तसे करताना ३ विकेट्स घेतल्या आहेत.

पाकिस्तानच्या दौऱ्या आधी पासूनच लसीथ मलिंगा फॉर्ममध्ये नव्हता. म्हणूनच त्याने देशांतर्गत सामने खेळण्याचे ठरवले. एमसीए एच्या अंतिम सामन्यात त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत चक्क ऑफ स्पिन गोलंदाजी केली. त्याहूनही मोठा धक्का त्याने क्रिकेट प्रेमींना तेव्हा दिला जेव्हा त्याने ऑफ स्पिन टाकताना चक्क ३ विकेट्स मिळवल्या.

स्थानिक लीगमध्ये तैजय लंका या संघाचे नेतृत्व मलिंगा करत होता. त्यांनी २५ व्या षटकात एलबी फायनान्सला १२५/७ मध्ये रोखले. तेजय लंकाने डकवर्थ-लुईस पद्धतीदनुसार हा सामना ८२ धावांनी जिंकला. ३४ वर्षीय श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य होता परंतु दुखापतीमुळे तो संघाबाहेर गेला.

“मी दुखापतीनंतर १९ महिन्यानंतर क्रिकेट खेळत आहे. झिम्बाब्वे आणि भारत मालिकेत मी चांगली कामगिरी करू शकलो नाही. मी झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत खेळू शकलो नाही. आजच्या कामगिरीनंतर मी विचार करत आहे की मी किती क्रिकेट अजून खेळू शकतो. मला माझ्या शरीराचाही विचार करायचा आहे. मी किती अनुभवी आहे याचा जर संघाला उपयोग होणार नसेल तर निवड समितीने मला संधी नाही दिली तरी चालेल.”असे मलिंगा म्हणाला.

श्रीलंका संघाने पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिकेत २-० ने विजय मिळविला होता, परंतु कसोटीत त्यांनी जेवढा चांगला खेल केला तेवढाच खराब खेळ त्यांनी एकदिवसीय आणि टी२०मध्ये केला.
पाकिस्तानने तीन सामन्यांच्या टी२०मालिकेत श्रीलंकेचा ३-० असा धुव्वा उडवला.