पहा: तमिम इक्बाल आणि मॅथ्यू वेड यांच्यातील वादावादीचा विडिओ व्हायरल

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आणि वाद हे अनेक दशकांच नातं. संघ कोणताही असो ऑस्ट्रेलिया समोर असेल तर वाद हे होणारच. आजही बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना याला अपवाद नव्हता.

आज जेव्हा दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा ऑस्ट्रेलिया पराभवाच्या छायेत होती. ऑस्ट्रेलिया २६५ धावांचा पाठलाग करत असताना ५वा बळी गेल्यांनतर तो फलंदाजीला मैदानात आला. परंतु विशेष करामत दाखवू शकला नाही.

जेव्हा हा फलंदाज ४ धावांवर बाद झाला तेव्हा पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये जाताना पंचांनी हस्तक्षेप करण्यापूर्वी तमिम इक्बाल आणि मॅथ्यू वेडमध्ये जोरदार बाचाबाची झाली. ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि स्लेजिंग, बाचाबाची ह्या काही नवीन नाही. परंतु यावेळी बांगलादेशचा तमिम इक्बालही माघार घ्यायला तयार नव्हता. त्याने वेडला सरळ ड्रेसिंग रूमचा रस्ता दाखवला. त्याचा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

पुढे हा रोमहर्षक सामना बांगलादेश संघाने २० धावांनी जिंकला. शाकिब उल हसनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. कसोटी क्रिकेटमधील बांगलादेशचा हा १० तर ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिलाच विजय होता.

पहा याचा संपूर्ण विडिओ: