Video: अॅलिस्टर कूकला टीम इंडियाने दिली अशी मानवंदना

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना शुक्रवारी (7 सप्टेंबर) सामना सुरु झाला आहे. हा सामना इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे.

त्याने सोमवारी (3 सप्टेंबर) या सामन्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचे जाहिर केले होते.

त्यामुळे आज इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर अॅलिस्टर कूक केटन जेनिंग्जबरोबर सलामीला फलंदाजीसाठी आला.

यावेळी तो जेव्हा मैदानात येत होता तेव्हा दोन्ही देशांचे झेंडे हातात घेतलेली लहान मुले दोन्ही बाजूंनी उभी होती.

त्याच्या पुढे भारतीय संघातील खेळाडूंनी दोन्हा बाजूंना उभे राहून कूकला गार्ड आॅफ आॅनर दिला. तर भारतीय कर्णधार विराट कोहलीने कूकबरोबर हात मिळवत त्याला शुभेच्छा दिल्या. याबरोबरच ओव्हल स्टेडियममधील प्रेक्षकांनीही उभे राहून कूकला मानवंदना दिली आहे.

याबरोबरच सामना सुरु होण्याआधी इंग्लंडचा माजी सलामीवीर फलंदाज अँड्र्यू ट्रॉसने कूकला खास कॅप देऊन सन्मानित केले.

कूकचा हा भारताविरुद्धचा 30 वा कसोटी सामना असून त्याने भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचाही विक्रम केला आहे. हा पराक्रम करताना त्याने आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगच्या भारताविरुद्ध खेळलेल्या 29 कसोटी सामन्यांच्या विक्रमाला मागे टाकले.

याबरोबरच कूक कारकिर्दीतील 161 कसोटी सामन्यांपैकी हा सलग 159 वा कसोटी सामना खेळत आहे.

तसेच कूक हा इंग्लंडचा कसोटीत सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक कसोटी सामने खेळणाराही खेळाडू आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीची अशी आहे आजवरील कामगिरी

इंग्लंड विरुद्ध भारत: पाचव्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया

टाॅप ५- पाचव्या कसोटीत होणार हे खास विक्रम