Video: आॅस्ट्रेलियन चाहत्यांकडून आपमान झाल्यानंतरही विराट कोहलीने दाखवली खिलाडूवृत्ती

अॅडलेड। भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया यांच्या अॅडलेड ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात चौथ्या दिवसाखेर(9 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 49 षटकात 4 बाद 104 धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी अजूनही 219 धावांची आवश्यकता आहे.

या सामन्यात शनिवारी, तिसऱ्या दिवशी (8 डिसेंबर) भारताचा कर्णधार विराट कोहलीची खिलावृत्ती चाहत्यांना पहायला मिळाली होती.

झाले असे की भारतीय संघ आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांवर संपुष्टात आल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यावेळी केएल राहुल आणि मुरली विजय लवकर बाद झाल्याने चेतेश्वर पुजारा आणि विराट फलंदाजी करत होते.

पण 34 व्या षटकात नॅथन लायन गोलंदाजीवर तिसरा चेंडूला विराटने फटकावले. परंतू हा चेंडू शॉर्ट लेगला उभ्या असणाऱ्या अॅरॉन फिंचच्या गळ्याला लागला. त्यामुळे फिंचला वेदना झाल्या. नंतर पून्हा जेव्हा लायन पुढचा चेंडू टाकायला गेला तेव्हाही फिंचला वेदना होत्या. ते पाहून विराटने गोलंदाजी करणाऱ्या लायनला थांबायला सांगितले आणि तो फिंचची विचारपूस करण्यासाठी गेला.

 

विराट जेव्हा फलंदाजीसाठी आला होता तेव्हा त्याला अॅडलेड ओव्हलमधील प्रक्षकांनी बू असा आवाज करुन डिवचले होते. मात्र तरीही विराटने फिंचबद्दल दाखवलेल्या खिलाडूवृत्तीमुळे चाहत्यांची मने जिंकली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: आॅस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आऊट होणार हे या दिग्गजाने आधीच ओळखलं!

गौतम गंभीरची ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीवर कठोर शब्दात टीका

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: पहिल्या कसोटीत विजयासाठी भारताला ६ विकेट्सची तर आॅस्ट्रेलियाला २१९ धावांची गरज

असा भीमपराक्रम करणारा विराट कोहली जगातील पहिलाच क्रिकेटपटू