Video: खेळाडू परतले, पंच मात्र निर्णय देण्यासाठी भरपावसात मैदानातच

नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध श्रीलंकेमधील पाचव्या वनडे सामन्यात श्रीलंकेने आयसीसी क्रमवारीत अव्व स्थानावर असलेल्या इंग्लंडला पराभूत केले. बाकीच्या सामन्यांमध्ये झालेल्या पावसाच्या व्यत्ययाचा त्रास या शेवटच्या सामन्यातही जाणवला.

एक क्षण असा आला की खेळाडू पावसामुळे ड्रेसिंग रूमकडे परतत होते मात्र पाकिस्तानी पंच अलीम दारने यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. कारण ते परत न जाता मैदानावर थर्ड अंपायरच्या निर्णयाची वाट पाहत उभे राहिले होते. त्यांच्या या भुमिकेची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान श्रीलंकेने इंग्लंडसमोर 367 धावांचे लक्ष्य ठेवले होते. तर लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 26 षटकात 8 बाद 132 धावा असा होता.

यावेळी 27व्या षटकात अकिला धनंजयाने लियाम प्लंकेटला पायचीत केले. तर दार यांनी त्याला बाद ठरवले मात्र प्लंकेटने रिव्ह्यू घेतला यावेळी जोरदार पावसाला सुरूवात झाली. म्हणून सगळे खेळाडू ड्रेसिंग रूमकडे परतले. पण दार हे थर्ड अंपायरच्या निर्णयाची वाट पाहत तसेच पावसात उभे राहिले. तसेच त्यांचाच निर्णय अचूक ठरल्याने इंग्लंडची नववी विकेट पडली.

हा सामना श्रीलंकेने डीएलएनुसार 219 धावांनी जिंकला. तर इंग्लंडने पाच वनडे सामन्याच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी मिळवत मालिका खिशात घातली.

महत्त्वाच्या बातम्या:

या कारणामुळे केदार जाधवला विंडीज विरुद्ध टीम इंडीयात मिळाले नाही स्थान

Video: एकच ग्लोव्हज घालून फलंदाजीला आला हा फलंदाज; पुढे काय झाले ते पहाच