पहा: युझवेन्द्र चहल आपले हसू रोखू शकला नाही

रांची । येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ९ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने आणि विशेषकरून फिरकी गोलंदाजांनी कमाल केली.

७व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जेव्हा युझवेन्द्र चहलने ग्लेन मॅक्सवेलला कुलदीप यादवकरवी झेलबाद केले तेव्हा युझवेन्द्रला हसू लपवता येत नव्हते.

याचे कारण म्हणजे गेल्या सलग ५ सामन्यात युझवेन्द्रने मॅक्सवेलला बाद केले आहे. एक सामना हा आयपीएलचा होता तर ३ सामने वनडे मालिकेतील होते शिवाय कालच्या सामन्यात मिळून असे एकूण ५वेळा जेव्हा ते समोरासमोर आलेत तेव्हा युझवेन्द्रने मॅक्सवेलला बाद केले आहे.

विशेष म्हणजे या सामन्यात मॅक्सवेल बऱ्यापैकी सेट झाला होता. तरीही त्याला बाद करण्यात युझवेन्द्र यशस्वी ठरला.