डीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला

मेजर लीग सॉकरमध्ये डी सी युनायटेडचा फुटबॉलपटू वेन रूनीने ९६व्या मिनिटाला लुसियानो एकोस्टाला गोल करण्यास मदत करत सामना जिंकून दिला. यावेळी डी सी युनायटेडने ओरलॅण्डो सिटीचा ३-२ने पराभव केला.

एकोस्टाच्या त्या गोलने हॅट्ट्रीक झाली तर संघाने सामना देखील जिंकला. त्याने ४९व्या आणि ६४व्या मिनिटाला गोल केले. तर सिटीकडून मिडफिल्डर क्रिस्टीयन हीग्युटाने ५५व्या मिनिटाला गोल केला पण त्यानंतर त्याला रेड कार्ड दाखवण्यात आले.

यामुळे युनायटेड २-१ अशी पुढे असताना डॉम ड्वेरने ७१व्या मिनिटाला गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला.

“शेवटच्या १० सेकंदात सामना जिंकल्याचा हा क्षण खूप वेगळाच आहे. १० जणांच्या विरोधात आम्ही चांगले खेळलो पण अजून खेळ सुधारण्याची गरज आहे”, असे रूनी म्हणाला.

“तो शॉट मारल्यानंतर मला असे वाटत होते की एकोस्टाने फक्त त्याला पुढे करावे आणि त्याने तसे केले”, असेही तो पुढे म्हणाला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

मेस्सीने बार्सिलोनासाठी केला हा मोठा पराक्रम

प्रीमियर लीग: फुटबॉलपटूने तब्बल पाच वर्षानंतर केलेला गोल ठरतोय चर्चेचा विषय