इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू वेन रुनीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त

इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू वेन रुनीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मँचेस्टर युनाइटेडचा हा माजी खेळाडू या मोसमपासून एव्हरटन क्लबसाठी खेळत आहे. इंग्लंडसाठी ११९ सामन्यात खेळताना रुनीने ५३ गोल केले आहेत.

यावेळी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात रूनी म्हणतो, ” देशासाठी खेळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. निवृत्ती घेणे हा माझ्यासाठी कठीण क्षण आहे. मी माझे कुटुंब, मॅनेजर, यांच्याशी याबद्दल चर्चा केली आहे. ”

वेन रुनीहा इंग्लंडचा आजपर्यंत सार्वधिक गोल केलेला खेळाडू आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या विश्वकप पात्रता फेरीच्या सामन्यात यामुळे रूनी खेळताना दिसणार नाही. रूनी सध्या ३१ वर्षांचा आहे. तो इंग्लिश प्रीमियर लीगमधील दिग्गज संघ असणाऱ्या मँचेस्टर युनायटेड संघाचाही कर्णधार राहिलेला आहे.