आम्ही येथे सुवर्णपदक जिंकायला आलो आहोत: मोनू गोयत

आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये भारतीय कबड्डी संघ त्यांचे सलग आठवे सुवर्ण जिंकण्यास सज्ज आहे. संघात उच्च दर्जाचे चढाईपटू, बचावपटू आणि अष्टपैलू असल्याने हा संघ 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या इतर कबड्डी संघांच्या तुलनेत समतोल भासतो.

भारतीय संघ जागतिक कबड्डीवर असलेले आपले वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत भारताने सातही सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यामुळेच सलग आठवे सुवर्ण जिंकण्याचा संघाला विश्वास आहे.

भारतीय चढाईपटू आणि प्रो-कबड्डीच्या यंदाच्या लिलावातील महागडा खेळाडू ठरलेला मोनू गोयत म्हणतो, “आम्हाला सुवर्णपदक जिंकण्याची परंपरा कायम राखायची आहे आमि तेच आमचे लक्ष्य आहे. याशिवाय काोणताही विचार नाही. सर्वच संघ उत्तम आहेत आणि आपले सर्वोत्तम प्रयत्न करतील. परंतु दक्षिण कोरिया, इराण, पाकिस्तान आणि बांग्लादेश हे संघ आव्हान देतील”.

येत्या 18 ऑगस्ट पासून आशियाई स्पर्धेला इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबँग येथे सुरूवात होत आहे. त्यातील कबड्डीचे सामने 19 ऑगस्ट पासून जकार्तामधील गरू़डा स्टेडियमवर पार पडतील.

भारतीय पुरूष संघ –

अजय ठाकूर (कर्णधार), राहुल चौधरी, रोहित कुमार, परदीप नरवाल, मोनू गोयत, रिशांक देवाडिगा, गंगधारी मल्लेश, मोहित छिल्लर, गिरीश इरनाक, राजू लाल चौधरी, दीपक हुडा, संदीप नरवाल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अजित वाडेकरांबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

वाढदिवस विशेष- कसोटी क्रिकेट गाजवलेल्या चंद्रपाॅलबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी