आॅस्ट्रेलियाचा फक्त तो एकटाच खेळाडू म्हणतो, विराट एक्सप्रेस थांबवणारच

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद 61 धावांची खेळी केली. त्याचा सध्याचा आणि कसोटीत धावा करण्याचा फॉर्म लक्षात घेता ऑस्ट्रेलिया संघावर दबाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर त्याला आम्ही कसोटीमध्ये धावा करण्यापासून रोखू असे मत ऑस्ट्रेलिया संघाचा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरे व्यक्त केले आहे.

“तिसऱ्या टी20 सामन्यात कोहलीने चांगली फलंदाजी केली. आधी तो बचावात्मक खेळत होता. पण नंतर त्याने पॉवरप्लेमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. मात्र कसोटी मालिकेत वेगळी परिस्थिती असेल. कारण आमच्याकडे नॅथन लियॉन हा उत्कृष्ठ गोलंदाज आहे”, असे कॅरे म्हणाला.

ब्रिसबेनमध्ये झालेल्या पहिल्या टी20 मध्ये ऑस्ट्रेलियाने विजय पटकावत तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली होती. तर मेलबर्नमधील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे भारताला मालिका बरोबरीत आणण्यासाठी सिडनीतील सामना जिंकणे गरजेचे होते.

या सामन्यात कोहलीने 41 चेंडूत नाबाद 61 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला दिनेश कार्तिकने नाबाद 22 धावा करत योग्य साथ दिली.

टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी राखल्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामन्याची मालिका खेळण्यास सज्ज आहेत. पहिल्या कसोटी सामन्याला अॅडलेडमध्ये सहा डिसेंबरपासून सुरूवात होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

धोनीबद्दल विचारताच गांगुलीने पाकिस्तानच्या अध्यक्षांना दिले होते हे गमतीशीर उत्तर

सध्या टीकेचा सामना करणाऱ्या हरमनप्रीत कौरचा आयसीसीकडून मोठा सन्मान