लग्नात आलेल्या पाहुण्यांना विराट अनुष्काने दिली ही खास भेट

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा ११ डिसेंबरला इटलीत विवाह सोहळा पार पडला. या जोडीने सोशल मीडियावरून सर्वांना ही बातमी दिली होती. त्यांनी ही बातमी देईपर्यंत याबद्दल सर्वांनी गुप्तता ठेवली होती.

पण आता त्यांच्या लग्नाबद्दलचे अनेक खुलासे होऊ लागले आहेत. नुकताच बीबीसीशी बोलताना विराट- अनुष्काच्या लग्नाचे नियोजन करणारी देविका नरेन हिने लग्नात पाहुण्यांना विराट अनुष्काकडून देण्यात आलेल्या भेटवस्तूबद्दल सांगितले आहे. तसेच ती म्हणाली त्याच्या विवाहाचे नियोजन हे एक अवघड काम होते.

देविकाने सांगितले, “अनुष्का आणि विराट हे खूप आध्यात्मिक लोक आहेत. मला माहित नाही किती लोकांना हे माहित आहे. अनुष्काला वृद्धी आणि समृद्धी दाखवणाऱ्या सगळ्या गोष्टी हव्या होत्या. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे नियोजन एका गार्डनमध्ये करण्यात आले. विराट आणि अनुष्का हे दोघेही रुमी आणि त्यांच्या कवितांचे चाहते आहेत. त्यामुळे त्यांनी सर्वांना रुमी यांचे कविता संग्रह भेट म्हणून दिले.”

या बरोबरच देविकाने या लग्नाचे नियोजन पूर्णपणे गुप्तता ठेवून करण्यात आल्याचे सांगितले. या नियोजनात काम करणाऱ्यांना विराट आणि अनुष्काचे नावही न घेण्यास सांगण्यात आले होते.

याबद्दल देविका म्हणाली, “हे खूप अवघड होते. माझ्या लक्षात आहे की आम्ही लग्नचे नियोजन करत होतो आणि आम्हाला माहित होते की कोणाचे लग्न आहे. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा मी अनुष्काला तिच्या नावाने हाक न मारता नववधू म्हणून हाक मारली होती. तेव्हा तिने मला या बद्दल विचारले होते हे काय आहे, तेव्हा मी तिला सांगितले की तुमच्या लग्नाबद्दल गुप्तता ठेवण्यासाठी असे आम्ही करत आहोत. “