क्रिकेटच्या जन्मदात्या देशात होतेय प्रथमच डे नाइट कसोटी

क्रिकेटचा जन्मदाता देश म्हणून इंग्लंड देशाकडे पहिले जाते. हा देश तब्बल ९८७ कसोटी सामने खेळला आहे. हा एक मोठा विक्रम आहे.

आजपर्यंत इंग्लंड देशात तब्बल ५०५ कसोटी सामने झाले आहेत. हाही एक विक्रम आहे. एवढे सामने होऊनही या देशात कधीही डे नाइट अर्थात दिवस रात्र कसोटी सामना झाला नाही.

परंतु आज होणारा कसोटी सामना हा इंग्लंड देशातील पहिला तर जागतिक क्रिकेटमधील ५वा डे नाइट कसोटी सामना आहे. हा पहिलाच सामना आहे जो डुक पिंक बॉलने खेळला जाणारा सामना आहे.

या सामन्याचे जवळजवळ ४०% पेक्षा जास्त तिकीट विकिली गेली आहेत. इंग्लंड विंडीज विरुद्ध १९७९मध्ये यापूर्वी पहिला डे नाइट एकदिवसीय सामना खेळली होती. तर झिम्बाब्वे विरुद्ध विंडीज हा पहिला डे नाइट सामना इंग्लंड देशात झाला होता.