भारत दौऱ्यासाठी विंडीज संघाची घोषणा

मुंबई | विंडीज संघाच्या भारत दौऱ्याची घोषणा झाली असुन आॅक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या दौऱ्यात २ कसोटी, ५ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.

यातील कसोटी मालिकेसाठी विंडीज संघाची घोषणा करण्यात आली आहे.

जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील संघात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस आणि केमार रोच यांना संधी देण्यात आली आहे.

जहामार हॅमिल्टन या एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या खेळाडूला या संघात स्थान देण्यात आले आहे.या २७ वर्षीय खेळाडून ७१ प्रथम श्रेणी सामन्यात २६.९८च्या सरासरीने ३३१९ धावा केल्या आहेत.

भारताविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या अल्झारी जोसेफ या खेळाडूने कसोटी संघात कमबॅक केले आहे.

पहिला कसोटी सामना हा राजकोटला  ४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान तर दुसरा कसोटी सामना १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान हैद्राबादला होणार आहे.

कसोटी मालिकेसाठी असा आहे विंडीज संघ-

जेसन होल्डर (कर्णधार), सुनिल अँब्रिस, देवेंद्र बिशु, क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस, शेन डॉव्रिच, शेनॉन गॅब्रिएल, जहामार हॅमिल्टन, शिमरॉन हेटमेयर, शाई होप, अल्झारी जोसेफ, किमो पॉल, कायरन पॉवेल, केमार रोच, जोमिएल वारिकेन

महत्त्वाच्या बातम्या-

पुणे- मुंबईत वनडे सामन्यांची मेजवानी, विंडीजच्या भारत दौऱ्याची घोषणा

भारत- पाकिस्तान नाही… आशिया खंडाचा खरा किंग तर अफगाणिस्तानच

लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे

-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?

-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड