वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल

वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा यांना मंगळवारी(25 जून) सकाळी छातीत दुखू लागल्याने मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटल, परळ येथे दाखल करण्यात आले आहे.

लारा मागील काही महिन्यापासून स्टार स्पोर्ट चॅनलच्या स्टुडिओमध्ये समालोचन करण्यासाठी मुंबईत वास्तव्यास आहेत. सध्या ते विश्वचषकाचेही समालोचन या स्टुडिओतून करत आहेत.

पण आज सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार त्यांच्या प्रकृतीबद्दल एका सुत्राने सांगितले की ‘ते छातीत दुखत असल्याचे सांगत होते, पण आता ते ठिक आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही.’ लारा यांची स्टार स्पोर्ट्सच्या अधिकाऱ्यांनी हॉस्पिटमध्ये जाऊन भेट घेतली आहे.

लारा यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 131 कसोटी सामन्यात 52.88 च्या सरासरीने 11953 धावा केल्या आहेत. यात त्यांच्या 34 शतकांचा आणि 48 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी वनडेमध्ये 299 सामन्यात 19 शतके आणि 63 अर्धशतकांसह 40.48 च्या सरासरीने 10405 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

११३३ खेळाडूंपैकी असा मोठा विश्वविक्रम करणारा शाकिब अल हसन पहिलाच!

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी अर्जून तेंडुलकर करतोय इंग्लंडला अशी मदत

भारताविरुद्धच्या सामन्याआधी विंडीजला बसला मोठा धक्का; हा मोठा खेळाडू विश्वचषकातून बाहेर