बापरे! भारत दौऱ्यावर आलेल्या त्या संघाला सरावाला साधं मैदान मिळालं नाही

वेस्ट इंडिजचा संघ आपल्या आगामी भारत दौऱ्यात  2 कसोटी, 5 वन-डे सामने आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. 4 ऑक्टोबर पासुन चालु होणाऱ्या मालिकेसाठी त्यांना सरावासाठी भारतात पुरेसा  वेळ मिळणे आवश्यक होते.

त्यासाठी त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे याबाबत त्यांनी विचारणी केली असता आम्हाला नकार देण्यात आला. भारतात सरावासाठी जागा मिळाली असती तर वेळ वाचला असता. आयसीसीने आम्हाला दुबईतील आयसीसी ग्लोबल अॅकॅडमी येथे सराव करण्यासाठी जागा दिली आहे. त्यात आम्ही आनंदी असल्याचे वेस्ट इंडीज संघाचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांनी सांगितले आहे.

भारतात सध्या चालू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2018 -19च्या सामन्यांमुळे मैदान उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.

वेस्ट इंडिजचा संघ आताच कॅराबियन प्रिमिअर लीग खेळूून आला आहे. कसोटी सामन्यात आमचा संघ संघर्ष  करत आहे. विवीध बेटावरून असलेल्या खेळाडूंनी या आव्हानाचा सामना करून  त्यात प्रगती करून घेतली पाहिजे असेही  स्टुअर्ट लॉ यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राचे राज्यस्तरीय कबड्डी पंच शिबीर २८सप्टेंबरपासून तीन दिवस पुण्यात

Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो

टीम इंडियाला नडलेल्या अफगाणिस्तान संघावर कौतूकाचा वर्षाव