तुम्ही एखाद्या निरपराध्याला पुन्हा पुन्हा आरोपी ठरवताय: श्रीशांत

भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीशांतने शुक्रवारी बीसीसीआयला ट्विट करून थेट नाराजगी व्यक्त केली आहे. या नाराजगी मागे मुख्य कारण म्हणजे भारतीय क्रिकेट बोर्डाने श्रीशांतबद्दल केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठात आव्हान देणार आहे.
याबद्दल त्याने दोन ट्विट केले आहेत. त्यात पहिल्या ट्विटमध्ये श्रीशांत म्हणतो, ” एखाद्या निरपराधी माणसाबरोबर अजून किती वाईट वागणार आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. ते पण नाही तर अनेक वेळा. तुम्ही एवढं वाईट का वागताय माझ्याशी? ”

श्रीशांत पुढे म्हणतो, “बीसीसीआय म्हणते आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम भूमिका घेतो. मग राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सला वेगळी वागणूक का?”

७ ऑगस्ट रोजी केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतवरील २०१३ मध्ये लावलेली बंदी उठवण्यात आली आहे.