आयपीएल लिलाव: तरुण खेळाडूंनी खाल्ला भाव; असे असतील आयपीएल २०१८ चे संघ

आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठीचा लिलाव काल आणि आणि आज असे दोन दिवस पार पडला. अनेक दिवसांपासून या लिलावाच्या चर्चा रंगल्या होत्या. बंगळुरूला पार पडलेल्या या लिलावात अनेक आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. तसेच यावर्षी अनेक मोठे खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असल्याने फ्रॅन्चायझींमध्ये चांगली स्पर्धा रंगली.

या लिलावात १९ वर्षांखालील भारतीय संघात असणारे पृथ्वी शॉ, शुभम गिल यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंसाठी कोटींमध्ये बोली लागली तर डेल स्टेन, हाशिम अमला, जो रूट अशा मोठ्या खेळाडूंना कोणी बोली लावली नाही. याबरोबरच फ्रॅन्चायझींनी तरुण खेळाडूंनाच अधिक पसंती दर्शवल्याने अनेक अनुभवी खेळाडूंना कोणत्याच संघात स्थान मिळाले नाही.

आयपीएल २०१८च्या या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला १२. ५० कोटींची बोली लागली. तर त्याच्या पाठोपाठ जयदेव उनाडकटला ११. ५० कोटीची किंमत मिळाली. या दोघांनाही राजस्थान रॉयल्सने खरेदी केले. जयदेव भारतीय खेळाडूंमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला.

तसेच काल केएल राहुल आणि मनीष पांडे या दोघांना ११ कोटीची बोली लागली होती. राहुलला किंग्स इलेव्हन पंजाबने तर मनीषला सनरायझर्स हैदराबादने संघात सामील करून घेतले.

असे असतील आयपीएल २०१८ चे संघ

चेन्नई सुपर किंग्स :
एम एस धोनी
सुरेश रैना
रवींद्र जडेजा
हरभजन सिंग
फाफ डू प्लेसिस
ड्वेन ब्रावो
केदार जाधव
शेन वॉटसन
आंबती रायडू
इम्रान ताहीर
कर्ण शर्मा
एन जगदीसन
मुरली विजय
सॅम बिलिंग्स
शार्दूल ठाकूर
लुंगी एन्गिडी
मोनू सिंग कुमार
केएम असिफ
मार्क वूड
मिचेल सॅन्टेनर
दीपक चाहर
कनिष्क सेठ
ध्रुव शोरे
क्षितिज शर्मा
चैतन्य बिष्णोई

मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा
हार्दिक पंड्या
जसप्रीत बुमराह
किरॉन पोलार्ड
मुस्तफिजूर रेहमान
पॅट कमिन्स
सूर्यकुमार यादव
कृणाल पंड्या
ईशान किशन
एव्हिन लेविस
सौरभ तिवारी
आदित्य तारे
शरद लुम्बा
सिद्धेश लाड
जेसन बेहरेनडॉर्फ
बेन कटिंग
अनुकूल रॉय
तेजिंदर सिंग
अकीला धनंजया
राहुल चाहर
मयांक मार्कंडे
मोहसीन खान
प्रदीप सांगवान
एमडी निधीश
जेपी ड्युमिनी

सनरायझर्स हैद्राबाद :
डेव्हिड वॉर्नर
भुवनेश्वर कुमार
युसुफ पठाण
कार्लोस ब्रेथवेट
मनीष पांडे
केन विलियम्सन
शाकिब अल हसन
शिखर धवन
वृद्धिमान सहा
रशीद खान
रिक्की भुई
दीपक हुडा
सिद्धार्थ कौल
बॅसिल थंपी
सईद अल अहमद
टी नटराजन
सचिन बेबी
तन्मय अग्रवाल
श्रीवत्स गोस्वामी
संदीप शर्मा
बिल्ली स्टॅन्लेक
मोहम्मद नबी
ख्रिस जॉर्डन
बिपुल शर्मा
सईद मेहदी हसन

राजस्थान रॉयल्स :
स्टीव्ह स्मिथ
अजिंक्य राहणे
बेन स्टोक्स
स्टुअर्ट बिन्नी
संजू सॅमसन
जॉस बटलर
राहुल त्रिपाठी
डार्सी शॉर्ट
जोफ्रा आर्चर
प्रशांत चोप्रा
कृष्णप्पा गॉथम
धवल कुलकर्णी
जयदेव उनाडकट
अनुरीत सिंग
झहीर खान पेक्टीन
बेन लाफ्लिन
दुशमंथा चामीरा
अंकित शर्मा
अर्यमान बिर्ला
श्रेयश गोपाळ
सुधेसन मिधून
महिपाल लोमरोर
जतीन सक्सेना

किंग्स इलेव्हन पंजाब:
अक्षर पटेल
युवराज सिंग
आर अश्विन
करूण नायर
के एल राहुल
ऍरॉन फिंच
डेव्हिड मिलर
मार्कस स्टोयनीस
मयांक अग्रवाल
अंकित राजपूत
मनोज तिवारी
ख्रिस गेल
मोहित शर्मा
मुजीब जदरां
बरिंदरसिंग स्रान
अँड्रयू टाय
बेन द्वारशुईस
परदीप साहू
अक्षरदीप नाथ
मयंक डागर
मंझूर दर

कोलकाता नाईट रायडर्स :
सुनील नारायण
आंद्रे रसेल
ख्रिस लिन
मिशेल स्टार्क
दिनेश कार्तिक
रॉबिन उथप्पा
पियुष चावला
कुलदीप यादव
शुभम गिल
ईशान जग्गी
कमलेश नागरकोटी
नितीश राणा
रिंकू सिंग
अपूर्व वानखडे
विनय कुमार
मिचेल जॉन्सन
शिवम मावी
कॅमरॉन डेलपोर्ट
जावोन सिर्ल्स

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर:
विराट कोहली
एबी डिव्हिलियर्स
सर्फराज खान
मोईन अली
कॉलिन डी ग्रँडहोम
ख्रिस वोक्स
ब्रेंडन मॅक्युलम
क्विंटॉन डी कॉक
उमेश यादव
युजवेंद्र चहल
मनन वोहरा
कुलवंत खजुरिलिया
अनिकेत चौधरी
नवदीप सैनी
पार्थिव पटेल
टीम साऊथी
नॅथन कुल्टर नाईल
एम अश्विन
मोहम्मद सिराज
मंदीप सिंग
वॉशिंग्टन सुंदर
पावन नेगी
पावन देशपांडे
अनिरुद्ध जोशी

दिल्ली डेअरडेव्हिल्स :
रिषभ पंत
ख्रिस मॉरिस
श्रेयश अय्यर
ग्लेन मॅक्सवेल
गौतम गंभीर
जेसन रॉय
कॉलिन मुनरो
मोहम्मद शमी
कागिसो रबाडा
अमित मिश्रा
पृथ्वी शॉ
राहुल तेवतीया
विजय शंकर
हर्षल पटेल
आवेश खान
नमन ओझा
मनजोत कालरा
शहाबाज नदीम
संदीप लॅमिच्छन
ट्रेंट बोल्ट
सायन घोष
डॅनियल ख्रिस्तियन
जयंत यादव
गुरकीरतसिंग मन
अभिषेक शर्मा