Video: आणि अखेर धोनीही चुकला

भारतीय संघाचा माजी कॅप्टन कूल एमएस धोनी ज्या गोष्टीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे आज त्याच गोष्टीत अर्थात डीआरएस घेण्यात आज तो चुकला.

श्रीलंका संघ १ बाद ८३ धावांवर असताना सदिरा समरविक्रमा जेव्हा १५ धावांवर खेळत होता तेव्हा त्याला कुलदीप यादवने पायचीत केले परंतु पंचानी त्याला बाद दिले नाही.

यावेळी पंचांच्या या निर्णयाविरोधात डीआरएस घ्यावा की नाही याबद्दल स्लीपमध्ये असलेल्या कर्णधार रोहित शर्माने धोनीला याबद्दल विचारले. परंतु यावेळी या माजी कर्णधाराने याबद्दल कोणतीही उत्सुकता दाखवली नाही.

परंतु जेव्हा हा चेंडू पुन्हा रिप्लेमध्ये दाखवण्यात आला तेव्हा यात चेंडू डाव्या यष्टीवर जाताना स्पष्ट जाताना दिसला. पुढे जाऊन सदिरा समरविक्रमाने ४२ धावांची खेळी केली आणि तब्बल १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारीही केली.