उपकर्णधार रहाणे शेवटच्या रांगेत तर अनुष्का शर्मा पहिल्या, चाहत्यांकडून जोरदार हल्लाबोल

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असुन इंग्लंड विरुद्ध त्यांची 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेदरम्यान लंडंनमधील भारतीय दुतावासाने भारतीय संघाला स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते.

मात्र या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावेळी भारतीय संघाच्या फोटोत भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित असल्याने त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.

हा फोटो बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘भारतीय संघातील सदस्य लंडनमधील भारतीय दुतावासामध्ये उपस्थित आहेत’ असे त्या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे.

हा फोटो भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा भारतीय दुतावासातील काही अधिकाऱ्यांबरोबर होता. मात्र या फोटोत अनुष्काही विराटच्या शेजारी उभी आहे आणि तेही पहिल्या रांगेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच चाहत्यांनी अनुष्का जरी कोहलीची पत्नी असली तरी भारतीय संघाच्या फोटोत तिला स्थान कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर चाहत्यांनी भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे शेवटच्या रांगेत आणि अनुष्का भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांसह पहिल्या रांगेत उभी असल्याचीही गोष्ट लक्षात आणून दिली आहे.

भारताचा इंग्लंड विरुद्ध दुसरा कसोटी सामना 9 आॅगस्टपासून लंडंनमधील लॉर्ड्स मैदानावर सुरु होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

वाढदिवस विशेष: फॅब-4 मधील केन विलियमसनबद्दल माहित नसलेल्या या 5 गोष्टी

बेन स्टोक्सच्या त्या घटनेचा विडिओ या व्यक्तीने काढला होता

तरुण, प्रतिभावान खेळाडूंबद्दल मास्टर ब्लास्टर सचिनचे मोठे भाष्य