आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?

मुंबई । आयपीएलचा हा ११ वा हंगाम असून या हंगामाची जोरदार चर्चा सध्या भारतात आहे. आयपीएलच्या १० विजेतेपदांपैकी ३ मुंबई इंडियन्स, २ चेन्नई सुपर किंग्जने २ तर कोलकाता नाईट रायडर्सने २ विजेतेपदं जिंकली आहेत.

एप्रिल-मे महिना एकप्रकारे भारतीय चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने क्रिकेटचा सोहळाच असतो. या स्पर्धेने अनेक देश विदेशातील खेळाडूंची जगाला ओळख करून दिली तसेच काही खेळाडूंना मालामाल केले.

काही खेळाडू तर या स्पर्धेपुर्वी अगदी शेतात काम करत होते. अशा काही खेळाडूंची केवळ या स्पर्धेमुळे जगाला दखल घ्यावी लागली.

असे असले तरी या मानाच्या ट्राॅफीवर नक्की काय लिहीले आहे किंवा ते कोणत्या भाषेत आहे याबद्दल मात्र जास्त कुणाला काही माहीत नाही.

या सोनेरी ट्राॅफीवर याच सर्व कारणामुळे ‘य़ात्रा प्रतिभा अवसरा प्रापनोती’ असे संस्कृत भाषेत लिहीले आहे. याचा मराठीमध्ये अर्थ होता ‘जिथे प्रतिभा असेल तर संधी प्राप्त होते.’

याचा इंग्लिश भाषेत अर्थ Where talent meets opportunity आणि हिंदी भाषेत जहां प्रतिभा अवसर प्राप्त करती है ।” असा अर्थ होतो.

याबद्दल माहिती देणारा ट्विट हा वेदिक स्कूलने केला आहे.

या ट्राॅफीवर गतविजेत्या संघांची नावे आणि त्यांनी कोणत्या वर्षात ही कामगिरी केली आहे हेही लिहीले जाते. 

महत्त्वाच्या बातम्या –

Video- चक्क स्टेडियमच्या बाजूला क्रेन उभे करून त्या फूटबाॅल वेड्याने घेतला सामन्याचा आनंद

अबब! विंबल्डनच्या बक्षिसांची रक्कम २०१८मध्ये तब्बल ३०० कोटी

पराभूत होऊनही मुंबईच्या हार्दिक पंड्या जिंकली सर्वांची मने

-म्हणून षटकार किंग युवराज दादाची कीट बॅग आवरायचा

भारताचे आयसीसी कसोटी क्रमवारीत मक्तेदारी कायम