आयपीएल मध्ये असं घडलं तर पाच संघ राहतील १४ गुणांवर, पुढे काय असतील सूत्र?

मुंबई आणि बेंगळुरूने उर्वरित आपले सर्व सामने जिंकले, कोलकाता विरुद्ध राजस्थान सामन्यात राजस्थान विजयी झाल्यास, पंजाबने चेन्नई विरुद्ध शेवटचा सामना जिंकल्यास, कोलकताने हैदराबाद विरुद्ध सामना जिंकल्यास तर एक नाही तर पाच संघाचे अंतिम गुण १४ होतील आणि दोन संघ नेट रनरेट नुसार प्लेऑफ साठी पात्र ठरतील. (सर्व सामन्यांचा निकाल आवश्यक आहे)

 

प्लेऑफ पात्र होण्यासाठी काय आहेत सूत्र ?

यंदाच्या बेस्ट वर्सेस बेस्ट आयपील २०१८ चे पर्व अंतिम टप्प्यात आलं तरी सुद्धा प्लेऑफचे चित्र अजून काही स्पष्ट झालं नाही. ८ पैकी २ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असून १ संघ बाद झाला आहे. प्लेऑफच्या उर्वरित दोन जागांसाठी पाच संघामध्ये जोरदार स्पर्धा बघायला मिळणार आहे.

१४ मे ते २० मे च्या दरम्यान होणाऱ्या साखळीतील उर्वरीत ९ सामने निर्णायक असणार आहेत, तर बघूया कोण कोणत्या संघाला प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता काय शक्यता आहेत.

◆सनराइजर्स हैदराबाद

आयपील २०१८ च्या पर्वातील प्लेऑफ साठी पात्र ठरलेला पहिला संघ, हा संघ आता पर्यत ०९ विजयासह पहिल्या स्थानी आहे. गुणतालिकेत पहिला किंवा दुसरा स्थान पक्का आहे त्यामुळे हा संघ क्वालीफायर सामना क्र.०१ खेळणार.

◆चेन्नई सुपर किंग्स 

आयपील २०१८ च्या पर्वात प्लेऑफ साठी दुसरा संघ पात्र ठरला आहे, ०८ विजयासह दुसऱ्या क्रमांकावर असल्याने उर्वरित सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांक स्थान पक्का करणाऱ्यांची संधी असेल.

◆मुंबई इंडियन्स 

आणखी एक पराभव संघ स्पर्धे बाहेर जाणार पण पुढील दोन्ही सामने जिंकले तरी प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी पंजाब, कोलकता व राजस्थान तीन संघापैकी किमान दोन संघाचा तरी एक-एक पराभव होणं आवश्यक आहे. त्यामुळे २ किंवा ३ संघ १४ गुणांवर आले तर नेट रनरेट नुसार प्ले ऑफ साठी पात्र होऊ शकतो.

◆किंग्स एलेव्हन पंजाब

उर्वरित तीन सामान्यांनपैकी दोन सामने विजयी झाले तर  प्लेऑफचे स्थान पक्का असेल, तिन्ही सामने जिंकले तर दुसरा क्रमांकवर जाऊन क्वालीफायर सामना खेळण्याची शक्यता आहे. जर दोन पराभव झाले आणि तर ३ किंवा ४ संघाचे १४ गुण झालेतर नेट रनरेट वर अवलंबून राहावं लागेल.

◆कोलकाता नाईट राइडर्स

उर्वरित दोन्ही सामने जिंकून प्लेऑफ साठी संघ पात्र ठरेल. जर एक पराभव झाला तर या संघाला नेट रनरेट वर अवलंबून राहावं लागेल.

◆राजस्थान रॉयल्स

उर्वरित दोन्ही सामने जिंकून प्लेऑफ साठी संघ पात्र ठरेल. जर एक पराभव झाला तर या संघाला नेट रनरेट वर अवलंबून राहावं लागेल.

◆रॉयल चैलेंजर्स बैंगलोर

आणखी एक पराभव संघ स्पर्धे बाहेर जाणार, जरी उर्वरित तिन्ही सामने जिंकले तरी सुद्धा नेट रनरेट व उर्वरित संघाच्या निकालवर अवलंबून राहावं लागेल यात काही शंका नाही.

◆दिल्ली डेयरडेविल्स

आतापर्यंतच्या १२ पैकी ०९ सामान्यातील पराभवामुळे हा संघ प्लेऑफ च्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे.

तरी क्रिकेट खेळात कोणत्याही निकाल लागले जाऊ शकतात, त्यामुळे उर्वरीत सामने निर्णायक होणार आत काही शंका नाही.

 

– अनिल भोईर