IPL 2018: मुंबई इंडियन्स करणार का पराभवाची मालिका खंडीत?

 मुंबई| आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बँगलोर यांचा सामना आहे. या दोन्ही संघानी आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्स हे तीनही सामने हरल्याने गुणतालिकेत सगळ्यात खाली आहे. बँगलोरचा संघ पण तीन पैकी दोन सामने हरला आहे. 

मुंबईचा पहिला सामना चेन्नई विरूद्ध झाला आहे. या सामन्यात चेन्नईने 1 विकेट आणि 1 षटक बाकी असताना तर हैद्राबाद बरोबर झालेल्या दुसरा सामना पण हैद्राबादने 1 विकेटने जिंकला होता. आताच झालेल्या दिल्ली विरूध्द 194-4 अशा धावा केल्या होत्या. दिल्लीने पण हा सामना शेवटच्या चेंडूत जिंकला.

मुंबईकडे फलंदाजीमध्ये सुर्यकुमार यादव आणि एविन लेवीस तर गोलंदाजीमध्ये धोनी, शिखर धवनसारख्या फलंदाजांचे विकेट्स घेणारा मंयक मरकंडे तसेच कृणाल पांड्या अशी मजबूत बाजू आहे.

बँगलोरकडे एबी डिव्हिलियर्स, ब्रेंडन मॅक्युलम असे फलंदाज आहेत. तसेच कर्णधार  विराट कोहली पण फॉर्ममध्ये आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर हे सामन्याचे रूप पालटू शकतात.

अशाप्रकारे या दोन्ही संघांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीची बाजू भक्कम आहे.

तसेच हे दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. घरचे मैदान असल्याने मुंबई इंडियन्ससाठी या हंगामातला पहिला विजय मिळवणे महत्वाचे आहे.

तर या सामन्यात कोणाचे पारडे जड ठरणार हे पाहणे मजेशीर ठरेल.

कधी होईल आयपीएल २०१८ मधील  मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बँगलोर सामना?
मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बँगलोर या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा चौदावा सामना आज, 17 एप्रिलला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बँगलोर यांच्यातील सामना?
मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बँगलोर यांच्यातील आजचा सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होईल. तसेच या मैदानावरच  मुंबईचे सर्व घरचे सामने होणार आहेत.

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर  बँगलोर  सामना?
आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बँगलोर सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बँगलोर सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बँगलोर सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बँगलोर सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बँगलोर सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:

मुंबई इंडियन्स रोहित शर्मा (कर्णधार ), जसप्रीत बुमराह, बेन कटिंग, अखिला धंनजया, जे पी ड्युमिनी, सुर्यकुमार यादव, ईशान किशन , सिध्देश लाड, एविन लेवीस, शरद लुंबा, मंयक मरकंडे, मिशेल मॅकलॅंघन, अॅडम मिलने, मोहसीन खान, मुस्फिजूर रहमान, हार्दीक पांड्या, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड, आदित्या तरे, सौरभ तिवारी, ताजिंदर सिंग, प्रदिप संघवान, एम डी निधीष, अनुकूल रॉय

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार ), एबी डिव्हिलियर्स, ख्रिस वोक्स, ब्रेंडन मॅक्युलम, क्विंटॉन डी कॉक, उमेश यादव, युजवेंद्र चहल, कुलवंत खजुरिलिया, मंदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, मोईन अली, कोरे अॅण्डरसन, मुरूगन अश्विन, अनिकेत चौधरी, कोलीन ग्रॅनधोम, पवन देशपांडे, अनिरूध्द जोशी, सर्फराज खान, मोहम्मद सिराज, पार्थिव पटेल, नवदिप सैनी, टिम साऊथी, मनन वोहरा