जेव्हा मी कोर्टवर प्रवेश केला तेव्हा मी सेरेनाची चाहती नव्हते- नाओमी ओसाका

युएस ओपनच्या अंतिम फेरीत सेरेना विल्यम्सला पराभूत करत जपानच्या नाओमी ओसाकाने इतिहास रचत विजेतेपद जिंकले. यावेळी तिने विल्यम्सला ६-२, ६-४ असे पराभूत केले.

“जेव्हा मी कोर्टवर प्रवेश केला तेव्हा मी सेरेनाची चाहती नाही तर एक टेनिसपटू होते. पण जेव्हा मी तिला आंलिगन दिले तेव्हा मला एखाद्या लहान मुलीसारखे वाटले”, असे ओसाका म्हणाली.

महिला एकेरीचे ग्रॅंड स्लॅम जिंकणारी ओसाका ही पहिलीच जपानी टेनिसपटू आहे.

ओसाका ही विल्यम्सचा खेळ बघून मोठी झाली. ‘मी तिला गुरू मानते आणि मला तू आवडते’ असे तिने विल्सम्सबाबत म्हटले. मात्र सामन्यात विल्यम्सच्या पंच कार्लोस रॅमोसबरोबर झालेल्या वादाने सामना हा एका वेगळ्याच दिशेला गेला. तसेच हा सामना जिंकल्यावर ओसाकाला रडू कोसळले.

“सगळे तिला प्रोत्साहन देत होते, पण त्याचा असा निकाल लागला बघून मला वाईट वाटत आहे”,असे ओसाका म्हणाली

“पहिल्यापासूनचे माझे सेरेना विरुद्ध युएस ओपनमध्ये खेळण्याचे स्वप्न होते. ते पुर्ण झाल्याचा मला मला आनंद आहे”, असेही ती पुढे म्हणाली.

या सामन्यात ओसाका ही एक उत्तम टेनिसपटू आहे हे तिने सिद्ध केले. सामन्याच्या सुरूवातीपासूनच तिने चांगला प्रतिकार केला. तसेच याआधी तिने विल्यम्सला मार्चमध्ये झालेल्या मायामी ओपनमध्ये पराभूत केले होते.

“ती सामन्यात पुर्णपणे लक्षकेंद्रीत करुन होती. जेव्हा मला ब्रेक पॉइंट मिळायचा तेव्हा ती उत्तम प्रकारे सर्व्ह करत होती. या सामन्यात तिने खुप चांगला खेळ केला. मला तिच्याकडून या सामन्यात भरपुर काही शिकायला मिळाले”, असे विल्यम्स म्हणाली.

तसेच विल्यम्सला हे ग्रॅंड स्लॅम जिंकून ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टच्या महिलांच्या सार्वकालिन २५ ग्रॅंड स्लॅमची बरोबरी करण्याची संधी होती. मात्र तिची ही संधी थोडक्यात चुकली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

युएस ओपन: सेरेना विल्यम्सला पराभूत करत नाओमी ओसाकाने रचला इतिहास

जेम्स अँडरसन ठरला टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी सर्वात धोकादायक गोलंदाज

शुटींग वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये अंकुर मित्तलला डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण पदक

युएस ओपन: नोवाक जोकोविचला दिग्गज टेनिसपटू पीट सॅम्प्रसच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी