पहा: धोनीने केली सरावादरम्यान गोलदांजी !

वनडे आणि टी-२०मध्ये कर्णधारपद सोडून धोनीने १ वर्ष झाले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील धोनीने फलंदाजी व क्षेत्ररक्षण या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विराट कोहली तर कर्णधार झाल्यापासून भलत्याच फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीच्या मागील १ वर्षाच्या कर्णधारपदाची काळात धोनीने विराटला रिव्हिव्ह घेतण्यात खूप मदत केली आहे, त्याने त्याच्या अनुभवाचा पूर्ण उपयोग करून दिला आहे.

धोनी रिव्हिव्ह घेणार म्हणजे बरोबरच असणार असे ही एक गणित आता तयार झाले आहे. धोनी जसा याआधी सहाव्या क्रमांकाला फलंदाजी करायचा तसा आता करत नसला तरी त्याने त्याच क्रमांकावर फलंदाजी करताना एक वेगळी भूमिका आत्मसात केली आहे. तो आता संपूर्ण डाव खेळून काढण्याचा प्रयत्न करतो.

फलंदाज, यष्टीरक्षक आणि आता गोलंदाजही. धोनीने तिसऱ्या सामन्याआधी नेटमध्ये सराव करताना गोलदांजीही केली आहे. तुम्ही याआधी धोनीला मध्यम गतीची गोलंदाजी करताना पाहिले असेल पण त्याने नेटमध्ये सराव करताना चक्क फिरकी गोलंदाजी केली आहे. बीसीसीआयने धोनीचा हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून शेयर केला आहे.

पहा कशी केली धोनीने ऑफ स्पिन !

धोनीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९ वेळा गोलंदाजी केली आहे, ७वेळा कसोटीमध्ये आणि २ वेळा वनडेमध्ये . त्यात त्याने १३२ चेंडू टाकले आहेत ९६ कसोटीमध्ये तर ३६ वनडेमध्ये. त्यात त्याने ९८ धावा दिल्या आहेत. ६७ कसोटीमध्ये आणि ३१ वनडेमध्ये. त्याने कसोटीमध्ये एक आणि वनडेमध्ये एक विकेट घेतली आहे.