जेव्हा फेडरर आणि नदाल पहिल्यांदा २००५ मध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते!

रविवारी झालेल्या मायामी ओपनच्या अंतिम फेरीत फेडररने नदाल विरुद्ध सरळ सेट मध्ये विजय मिळविला. या वर्षी फेडररने नदालला तीन सामन्यात तेही अंतिम फेरीत पराभूत केले आहे. तब्बल बारा वर्षांपूर्वी याच ठिकाणी ( फ्लोरिडा ) येथेच ते पहिल्यांदा एकमेकांविरुद्ध अंतिम सामन्यात खेळले, ते वर्ष होते २००५.  त्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी टेनिस जगतावर आपली जबदस्त छाप सोडली आहे.
त्या बारावर्षांपूर्वी काय झाले होते ते….

… फेडरर- नदाल तेव्हा फक्त दुसऱ्यांदा समोरासमोर आले होते…
… तेव्हा नदालला ‘राफेल नदाल परेरा’ असही म्हटलं जायचं…
… ती नदालची पहिलीच एटीपी मास्टर्स १०००ची फायनल होती…
… तेव्हा तो फ्रेंच ओपनचा एकही सामना खेळला नव्हता…
… तेव्हा राफाकडे एकही ग्रँडस्लॅम ट्रॉफी नव्हती…

… तेव्हा रॉजर फेडररकडे ४ ग्रँडस्लॅम ट्रॉफी होत्या…
… तर सेरेना विल्यम्सकडे ७ ग्रँडस्लॅम ट्रॉफी होत्या…
…राफा जागतिक क्रमवारीत ३१वा होता…
…फेडरर अव्वल स्थानावर विराजमान झाला होता…
…तरीही फ्रेंच ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे गेला नव्हता…
…फेडररनंतर जागतिक क्रमवारीत हेवीट आणि अँडी रॉडिक होते…


…तर मराट साफिन ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला होता…
…जोकोविचने त्याच्या पहिल्याच ग्रँडस्लॅम सामन्यात तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती…
…स्टॅन वावरिंका पहिल्या १०० मध्ये जागा मिळविण्यासाठी धडपडत होता…
…अँडी मरे नुकताच जुनिअर सर्किटमधून मुख्य स्पर्धा खेळायला सुरुवात करत होता…
…पहिल्या विजयाबरोबर ऍना इवोनिक आपलं १७ वा वाढदिवस साजरा करत होती…


…तेव्हा नदाल म्हटलं कि क्रीडाचाहते मिन्गुइल अँगेल नदाल याच नाव घेत होते…
…तेव्हा निक कॅर्गीओस फक्त ९ वर्षांचा होता…
…आंद्रे आगासी तेव्हा टॉप१० मध्ये होता…
… कार्लोस मोया जागतिक क्रमवारीत राफाच्या पुढे होता… पण पुढील ३-४ आठवड्यात सगळं बदललं…
…कुणी विचारही केला नव्हता कि ब्यूयान बॉर्गच ६ फ्रेंच ओपनच रेकॉर्ड कुणी मॉडेल…
…आणि कुणी विचारही केला नव्हता की यापुढे १२ वर्षांनंतरही नदाल-फेडरर मधील द्वंद्वाची एवढी मोठी चर्चा टेनिस जगतात होईल…