प्रो कबड्डी: त्या खेळाडूने गोंदले बॉलीवूड स्टार अक्षय कुमारचे टॅटू

प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमात बॉलीवूड स्टार अक्षय कुमारने बेंगाल वॉरियर्स हा संघ विकत घेतला आहे. अक्षय कुमार या संघाचा सहमालक आहे. परंतु या स्टारचा मोठा चाहता आहे बेंगलुरु बुल्स संघात.

बेंगुलरू बुल्सचा टॉप रेडर आणि कर्णधार रोहित कुमार हा अक्षय कुमारचा मोठा चाहता आहे. त्याने आपल्या डाव्या हाताच्या दंडावर बॉलीवूड स्टार खिलाडी अक्षय कुमारचा टॅटू गोंदला आहे.

याबद्दल बेंगुलरू बुल्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करण्यात आला आहे. त्यात “आमचा खिलाडी नंबर १ जेव्हा खिलाडी नंबर एकाला भेटतो, #FullChargeMaadi #AkshayKumar ” असे म्हटले आहे.

त्याच्या मानेवरसुद्धा अक्षय कुमारचे नाव आहे त्यात त्याने अक्की असे लिहिले आहे तर डाव्या दंडावर अक्षय कुमार फोटो गोंदुन त्याखाली ९ सप्टेंबर १९६७ अशी अक्षय कुमारची जन्मतारीख सुद्धा लिहिली आहे.

रोहितने पाठीमागे एकदा सांगितले होते की अक्षय कुमार हा माझा पहिल्यापासूनच आदर्श आहे त्याने कष्ट घेऊन त्याने जी ओळख निर्माण केली आहे ती लाजबाब आहे. मी त्याला त्याच्याकडून स्फुर्ती घेऊन त्याच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करतो.