जेव्हा पृथ्वी शाॅ हिटमॅन रोहित शर्माला ‘खडूस’ म्हणतो

कसोटी पदार्पणातच शानदार शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शाॅवर सध्या कौतूकाचा वर्षाव होत आहे. पृथ्वीवर कौतूक करणांऱ्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंह, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्माचा समावेश आहे.

विंडीज विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पृथ्वी शाॅला काही निवडक ट्विट वाचण्यासाठी बोलावण्यात आले होते.

त्यावेळी रोहित शर्माच्या ट्विटवर बोलताना पृथ्वी म्हणाला. ”आभारी आहे रोहित. मी रोहित सोबत कित्येकदा खेळलो आहे. तो एक खुप मजेदार व्यक्ती आहे. मला त्यांची फलंदाजी आवडते. तो मुुंबईचा चांगलाच खडूस फलंदाज आहे. तो शानदार पद्धतीने चेंडूला पुल करतो.”

मुंबईकर फलंदाजांना जागतिक क्रिकेटमध्ये त्यांच्या फलंदाजीसाठी खडूस म्हणुन ओळखले जाते. टिच्चून फलंदाजी करणे हा मुंबईकर फलंदाजांचा गुणधर्म जागतिक क्रिकेटमधील सर्वांनाच चांगलाच माहित आहे. याचमुळे आपल्या मुंबईमधील संघसहकाऱ्याला पृथ्वीने खडूस असा शब्द वापरला.

महत्वाच्या बातम्या-