जेव्हा अभिनेता धनुष घेतो मास्टर ब्लास्टर सचिनची भारत पाकिस्तान सामन्याच्यावेळी भेट

आज भारत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमधला ४था सामना बर्मिंगहॅम येथे होत असून भारतातील दिग्गज कलाकार, क्रिकेटपटू, उद्योगपती ह्या सामन्याला हजेरी लावण्यासाठी इंग्लंडला गेले आहेत. विशेष म्हणजे त्यात आज दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष याचाही समावेश आहे.

धनुषने त्याच्या अधिकृत ट्विटरवरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात धनुष् म्हणतो, “सध्या मी स्टेडियमयामध्ये भारत पाकिस्तान सामन्यासाठी आलो आहे. आणि ह्या वेळी मी क्रिकेटचा देव सचिनला भेटत आहे.

आज जेव्हा सचिन हा स्टेडियममध्ये आल्यावर त्याला मैदानात दाखवण्यात आले तेव्हा प्रेक्षकांनी सचिन सचिनचा गजर केला. आज सचिन हिंदीमध्ये समालोचन करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.