बुमराह आणि नो बाॅल…टायटॅनिकपेक्षाही भारी लव्हस्टोरी….

नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मंगळवारी (21 आॅगस्ट) चौथ्या दिवसाखेर 9 बाद 311 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी 1 विकेटची तर इंग्लंडला 210 धावांची गरज आहे.

या सामन्यात भारताकडून दुसऱ्या डावात बुमराहने २९ षटकांत ८५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.

बुमराहचा हा केवळ ४था कसोटी सामना होता. या ४ कसोटी सामन्यात त्याने २२.६२च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या आहेत.

असे असले तरी काल बुमराहकडून नेहमीप्रमाणे एक नकोसा विक्रम झाला. कालही या खेळाडूने नो बाॅलवर विकेट घेतली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार अशा वेळी घडला जेव्हा संघाला विकेटची सक्त गरज होती.

काल शेवटच्या १६ षटकांत भारतीय संघाला इंग्लंडच्या दोन विकेट्स घेता आल्या नाही. अदिल राशिद आणि स्टुअर्ट ब्राॅड जोडीने चांगलाच किल्ला लढवला. तसेच शेवटच्या ५.२ षटकांत एक विकेट हवी असतानाही भारतीय गोलंदाजांना ती मिळविण्यात अपयश आले.

बुमराहने अदिल राशिदला हे जीवदान दिले होते. त्याच राशिदने पुढे जात चक्क ५५ चेंडू खेळले तसेच सामना ५व्या दिवसापर्यंत नेला. अखेर हेच अपयश आता भारतासाठी डोकेदुखी ठरु शकते. कारण आज नॉटींगघमला पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

यामुळे सध्या बुमराह मात्र चांगलाच ट्रोल होत आहे. यातील काही निवडक ट्विट-

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम

केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी

सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?