पुण्यात आल्यावर ‘टीम इंडिया’ या ठिकाणाला भेट देतेच !

पुणे । काल भारतीय क्रिकेट संघाचे पुणे शहरात आगमन झाले. भारत विरुद्ध न्यूजीलँड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी संघ पुण्यात दाखल झाला आहे.

काल या संघाने पुणेकर क्रिकेटपटू केदार जाधवच्या घरी खास मेजवानीचा आनंद घेतला. आज संघाची अधिकृत पत्रकार परिषद होईल तर भारत विरुद्ध न्यूजीलँड दुसरा वनडे सामना उद्या एमसीए स्टेडियम गहुंजे येथे होणारअसल्यामुळे आज अर्थात मंगळवारी सकाळी ९ ते १२ यावेळेत न्यूजीलँड संघ तर २ ते ५ या यावेळेत भारतीय संघ सराव करणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचं जरी वेळापत्रक व्यस्त असलं तरी पुण्यात आल्यावर संघ एका खास ठिकाणाला नक्की भेट देतो. ते ठिकाण आहे ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’. देशातील क्रिकेटचे सर्वात सुंदर संग्रहालय असलेले ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ पुण्यातील सहकारनगर भागात आहे.

या क्रिकेट संग्रहालयात अनेक क्रिकेटपटूंच्या अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत. विशेष म्हणजे या संग्रहालयात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहलीसाठी खास वॉल आहेत.

विराटच्या वॉलवर प्रत्येक सामन्यानंतर त्याच्या धावा लावल्या जातात. या संग्रहालयाला देश विदेशातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भेट दिली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली जेव्हा पुण्यात येतात तेव्हा या संग्रहालयाला नक्की भेट देतात.

भारतीय संघ जेव्हा पुणे शहरात सामना खेळायला येतो तेव्हा संघातील अनेक खेळाडू या ठिकाणाला भेट देतात तसे आपल्या काही ऐतिहासिक वस्तू चाहत्यांना पाहता याव्यात म्हणून भेटही देतात.

ह्यावेळी तरी अजून तरी टीम इंडिया’ने संग्रहालयाला भेट दिल्याची कोणतीही बातमी नाही.

या संग्रहालय उभे करण्यात रोहन पाटे या क्रिकेटप्रेमी तरुणाचा मोठा हात आहे. त्याच्या कष्टाचे फळ म्हणून हे देशातील सर्वात मोठे आणि सुंदर संग्रहालय पुणे शहरात आहे.

गेल्यावेळी जेव्हा टीम इंडिया पुण्यात आली होती तेव्हा त्यांनी ताम्हिणी घाटात सफर केली होती तर अजिंक्य रहाणेने पुण्यातील लाल-महालला भेट दिली होती.