विराट-रैनामध्ये कोण आहे टी२०चा खरा किंग?

मुंबई | भारतात सध्या आयपीएल सुरू असल्यामूळे टी२० प्रकारची जोरदार चर्चा आहे. आयपीएलच्या या ११ व्या हंगामात सर्वाधिक चर्चा अर्थातच विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची. 

परंतू टी२० सामन्यात भारतात ज्या दोन खेळाडूंची नेहमीच तुलना होते त्यात विराट कोहली आणि सुरेश रैना या जोडीचा समावेश आहे. 

रैना हा कायमच या प्रकारात उत्तम क्रिकेट खेळत आला आहे. तर विराट कोहली गेली ३-४ वर्ष या प्रकारात सातत्याने धावा करत आहे. यामुळे या दोन खेळाडूंमध्ये तुलना होणे हे ओघानेच आले. 

याचमूळे यांच्या टी२०मधील कामगिरीचा खास आढावा घेणारी ही आकडेवारी- 

ट्वेंटी२० सामन्यांत (सर्व प्रकारच्या २० षटकांच्या सामन्यात )भारतीय खेळाडूंनी केलेल्या सर्वाधिक धावा-
७३९६- सुरेश रैना, सामने- २७८
७२९६- विराट कोहली, सामने- २३२

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
४६१९- विराट कोहली, सामने- १५३
४५५८- सुरेश रैना, सामने- १६३

आयपीएल आणि चॅपीयन्स लीगमध्ये मिळून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
५४००- सुरेश रैना, सामने- २४
५०४३- विराट कोहली, सामने- १५

चॅपीयन्स लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
८४२- सुरेश रैना, सामने- २४
४९७- मुरली विजय, सामने- १९
४४९- एमएस धोनी, सामने-२४
४२४- विराट कोहली, सामने- १५

 एकाच संघाकडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
५०४३- विराट कोहली, सामने- १६८, बेंगलोर
४५७९- सुरेश रैना, सामने-१५८, चेन्नई

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय
१९८३- विराट कोहली, सामने- ५७
१८५२- रोहीत शर्मा,सामने- ७९
१४९९- सुरेश रैना, सामने- ७३

महत्त्वाच्या बातम्या –