वॉचमनच्या मुलाची झाली आशिया कपसाठी टीम इंडियात निवड

मुंबई |आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. विराट कोहलीला या मालिकेत विश्रांती देण्यात आली असुन रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

तर सलामीवीर शिखर धवन संघाचा उपकर्णधार असणार आहे. अंबाती रायडू, केदार जाधव, मनीष पांडे यांनी संघात पुनरागमन केले आहे.

या संघात सर्वात आश्चर्यकारक निवड म्हणजे खलील अहमद या खेळाडूची. केवळ २ प्रथम श्रेणी सामने, १७ अ दर्जाचे सामने, १२ ट्वेंटी२० आणि १ आयपीएल सामना खेळलेल्या या खेळाडूला संघात संधी दिली गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

परंतु इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ कडून खेळताना या खेळाडूने ५ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच परवा संपलेल्या चौरंगी मालिकेत त्याने ४ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या आहेत.

५ डिसेंबर १९९७ला राजस्थानमध्ये जन्म झालेल्या या खेळाडूचे वडील हे वाॅचमॅन म्हणुन काम पाहतात. त्यांचा खलील अहमदच्या क्रिकेट खेळण्याला विरोध होता. त्यांनी त्याचे मन वळविण्याचाही प्रयत्न केला परंतु अखेर त्याने आयपीएल, नंतर राजस्थान आणि आता देशाच्या संघात स्थान मिळवलेच.

आयपीएल २०१८च्या हंगामात हैद्राबाद विरुद्ध कोलकाता सामन्यात त्याने १८ चेंडूत ३८ धावा दिल्या होत्या. त्यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. तब्बल ३ कोटी रुपये देऊन २०१८च्या हंगामात त्याला हैद्राबादने आपल्या संघात घेतले होते. त्याची बेस प्राईज केवळ २० लाख होती. किंग्ज ११ पंजाब आणि दिल्ली डेअरडेविल्स त्याला संघात घेण्यासाठी इच्छुक होते.

२०१६मध्ये या खेळाडूला दिल्ली डेअरडेविल्स संघाने १० लाख रुपये मोजत संघात घेतले होते परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

तो डाव्या हाताने मध्यमतगती गोलंदाजी करतो. २०१६ला १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ३ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या होत्या.

२०१७-१८ मध्ये या खेळाडूने राजस्थान संघाकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

तसेच विजय हजारे ट्राॅफीमध्ये ६ सामन्यात १० विकेट्स घेतल्या. तसेच भारत ब कडून कर्नाटक विरुद्ध देवधर ट्राॅफीच्या अंतिम सामन्यात खेळताना त्याने ४९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या.

खलील अहमदची कारकिर्द थोडक्यात-

अ दर्जाच्या १७ सामन्यांत २८ विकेट्स

प्रथम श्रेणीच्या २ सामन्यांत २ विकेट्स

ट्वेंटी२०च्या १२ सामन्यात १७ विकेट्स

आयपीएलच्या एका सामन्यात एकही विकेट नाही

असा आहे आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरश्रक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, खलील अहमद आणि अक्षर पटेल

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माकडे कर्णधारपद

 बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार

 याच दिवशी ७ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय

 वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

 टाॅप ४- जसप्रीत बुमराहचे ते ४ नो बाॅल आणि इतिहास…