सुवर्णपदक विजेत्या या भारतीय धावपटूने ५ महिन्याच्या आपल्या मुलाला अजूनही पाहिलेले नाही!

इंडोनेशियात सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय अॅथलिट्सने चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये मनजीत सिंगने मंगळवारी(29 आॅगस्ट) पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. मात्र त्याचा हा एशियन गेम्सपर्यंतचा प्रवास खडतर होता.

मनजीत मागील काही महिने सरावामुळे घरापासून दूर आहे. त्यामुळे त्याने त्याच्या 5 महिन्याच्या मुलालाही अजून पाहिलेले नाही. यातूनच त्याची त्याच्या खेळासाठी असणारी जिद्द आणि समर्पण दिसून आले आहे.

तसेच तो या स्पर्धेआधी कोणत्याही प्रकाशझोतात नव्हता. त्याने ही 800 मीटर शर्यत भारताचाच जिन्सन जॉन्सनला मागे टाकत जिंकली.

वडीलांकडून प्रभावित होऊन मनजीतने वयाच्या पाचव्या वर्षापासून धावायला सुरुवात केली होती. त्याचे वडील हरियाणातील नर्वानामध्ये गोळाफेक आणि थाळीफेक हे खेळ खेळायचे.

तसेच मनजीत एशियन गेम्सच्या आधीपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकला नव्हता. तो या एशियन गेम्ससाठी मागील वर्षी झालेल्या भारतीय संघाच्या ट्रायल्समधून पात्र ठरला होता. या नॅशनल ट्रायल्समध्ये त्याने जिन्सन जॉन्सनच्या नंतर दुसरा क्रमांक पटकावला होता

तसेच त्याचे ONGC बरोबरच्या कराराचेही नूतनीकरण करण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याला नोकरी नसतानाही महिन्याला सरावासाठी जवळजवळ 30000 खर्च करावा लागत होता.

एशियन गेम्समध्येही 800 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीसाठीही तो अगदी थोड्या फरकाने पात्र ठरला होता. अंतिम फेरीतही तो सुरुवातीला जॉन्सनच्या मागे होता. पण त्याने उशीरा आघाडी घेत हे सुवर्णपदक पटकावले.

याबरोबरच मनजीतने या एशियन गेम्समध्ये 1500 मीटर शर्यतीतही अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. 1500 मीटर शर्यतीची अंतिम फेरी 30 आॅगस्टला पार पडेल. यात भारताचा जिन्सन जॉन्सनही पात्र ठरला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: केवळ ०.२४ सेंकदाने हुकले सुवर्णपदक

एशियन गेम्स: टेबल टेनिस मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक

एशियन गेम्स: डोळे मिटून १००मीटर शर्यत पूर्ण केली