कोण आहे श्रेयस अय्यर..??

धरमशाला येथे होत असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम कसोटीसाठी विराट कोहलीला बॅकअप पर्याय म्हणून श्रेयस अय्यर या खेळाडूला भारतीय क्रिकेट बोर्डने तातडीने बोलावून घेतले आणि प्रसामाध्यमात जी कोहली आणि इतर वादांबद्दल चर्चा सुरु होती तिचा केंद्रबिंदू अचानक श्रेयस अय्यर नावाचा २२ वर्षीय मुंबईकर खेळाडू ठरला.

श्रेयस अय्यर, मुंबई रणजी संघाचा गेले ३-४ वर्ष महत्वाचा भाग असणारा खेळाडू सध्या खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असणाऱ्या भारतीय स्टार कर्णधार विराट कोहलीला बॅकअप पर्याय म्हणून त्याला बोलवण्यात आले आहे. श्रेयस अय्यरची देवधर ट्रॉफीसाठी इंडिया ब्लू संघात निवड झाली होती. त्यासाठी तो विझाग येथे रवानाही झाला होता.

श्रेयस अय्यर खऱ्या अर्थाने सर्वांच्या नजरेत आला होता जेव्हा त्याला तब्बल २.६ कोटी रुपये देऊन आयपीएल मधील दिल्ली डिअरडेविल्स संघाने घेतले होते. श्रेयसने एवढ्या मोठ्या रकमेचं मोलही काय असत ते दाखवून दिल. १४ सामन्यात ४३९ धावा करून श्रेयस उभारता खेळाडू हा आयपीएलचा पुरस्कारही मिळविला.

अय्यर रणजी ट्रॉफी २०१६-१७ मोसमातील मुंबई कडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. ४२.६४च्या सरासरीने १० सामन्यात ७२५ धावा ह्या २२ वर्षीय खेळाडूने या रणजी मोसमात केल्या आहेत. त्यात २ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.

२०१५-१६ मोसमात जेव्हा मुंबई संघ विक्रमी ४१ वेळी जिंकला तेव्हा श्रेयसने तब्बल १३२१ धावा केल्या होत्या. एका रणजी मोसमात १३०० धावा करणारा तो लक्ष्मण नंतरचा फक्त दुसरा खेळाडू होता. २०१६-१७ रणजी मोसमात मुंबई गुजरात विरुद्ध जी फायनल हरळी त्यातही श्रेयसने १३७ चेंडूत ८२ धावांची खेळी केली होती. गेले तीन मोसम अय्यर हा मुंबई रणजी संघाचा सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या सर्व सामन्यात श्रेयसने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २७ चौकारांच्या मदतीने द्विशतकी खेळी केली होती तर बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी.

उद्या जर संधी मिळाली तर श्रेयस त्याचा मुंबईकर कर्णधार रहाणेच्याच नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण करेल.

श्रेयस अय्यर

२०१४/१५:  ८०९ धावा ५०.५६ सरासरी

२०१५/१६:  १५८५ धावा ६०.९६ सरासरी

२०१६/१७:   ९२७ धावा ५४.५२ सरासरी