विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज: मोहम्मद आमीर

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरच्या मते भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याचा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याने विराटला स्टीवन स्मिथ, जो रूट आणि केन विल्यम्सन यांच्यापेक्षा महान फलंदाज म्हटले आहे.

आमिरने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर एक चॅट सेशन ठेवला होता, ज्यात तो चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होता. तेव्हा त्याला चाहत्यांकडून प्रश्न विचारण्यात आला की रूट, स्मिथ, कोहली आणि विल्यम्सन याच्यातील सर्वोत्तम फलंदाज कोण?

या प्रश्नाला त्याने असे उत्तर दिले, ” ते सर्वच महान फलंदाज आहेत, पण माझ्या मते विराट हा सर्वोत्तम आहे. “

यानंतरच्या प्रश्नात जेव्हा त्याला विचारण्यात आले की सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज कोण आहे तेव्हा देखील त्याच उत्तर त्याने विराट असेच दिले.

२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात अमीरने भारतीय फलंदाजीतील पहिल्या ३ फलंदाजांना बाद केले होते. ज्यामध्ये कोहली, शिखर धवन व रोहित शर्मा यांचा समावेश होता. पाकिस्तानने १८० धावांनी भारतावर विजय मिळवला होता आणि आपली पहिली वहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.