हे माहित आहे का? कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक वेळा फलंदाजांना ० धावेवर बाद केले?

क्रिकेटमध्ये सार्वधिक वाईट गोष्ट कोणती असेल तर ० धावेवर बाद होणे. त्याला डक असेही संबोधले जाते. परंतु डक अर्थात ० धावेवर एखाद्या फलंदाजाला बाद करणे ही गोलंदाजासाठी मोठी गोष्ट असते.

मग जागतिक क्रिकेटमध्ये असा कोणता गोलंदाज आहे ज्याने त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाला ० धावेवर सार्वधिक वेळा बाद केले आहे? तर तो खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ आहे. त्याने त्याच्या ५६३ कसोटी बळी पैकी तब्बल १०४ वेळा फलंदाजाला ० धावेवर बाद केले आहे.

या १०४ मध्ये त्याने मायकल अथरटन, राहुल द्रविड, शेर्विन चॅम्पबेल आणि मेरव डिल्लन यांना प्रत्येकी ३ वेळा ० धावेवर बाद केले आहे.