कोण आहे हा विजय शंकर

कोलकाता । शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांना भारतीय कसोटी संघातून वैयक्तिक कारणांमुळे मुक्त करण्यात आले आहे. भुवनेश्वर कुमार येत्या २३ तारखेला लग्न करणार असल्यामुळे तर शिखर धवनने माघार घेण्याचे कारण वैयक्तिक सांगितले आहे.

भुवनेश्वर कुमार श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही तर शिखर धवन फक्त दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसेल परंतु तो तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असल्याचे त्याने सांगितले आहे.

भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात तामिळनाडूच्या अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला संधी देण्यात आली आहे.

कोण आहे हा विजय शंकर-
विजय शंकर मधल्या फलित फलंदाजी करतो. २६ वर्षीय शंकर इंडिया अ संघाबरोबर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. त्याच्या महत्वपूर्ण ७२ धावांमुळे भारतीय संघ तिरंगी मालिकेत विजयी झाला होता. न्यूझीलँड संघाविरुद्ध इंडिया अकडून खेळताना त्याने फलंदाजीत महत्वपूर्ण योगदान दिले होते.

त्याने ३२ प्रथम श्रेणी सामन्यात १६७१ धावा तसेच २७ विकेट्स घेतल्या आहेत. या खेळाडूच्या चेन्नई येथील निवासस्थानी टेरेसवर इनडोअर सरावाची खेळपट्टी आहे. तेथे तो फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करतो.