टीम इंडियाच्या कालच्या पराभवानंतर दिग्गज काय म्हणाले, ते पहाच

दिल्ली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी(13 मार्च) पाचवा वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 35 धावांनी विजय मिळवला. तसेच 5 सामन्यांची वनडे मालिकाही ऑस्ट्रेलियाने 3-2 अशा फरकाने जिंकली.

फिरोजशहा कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 50 षटकात विजयासाठी 273 धावांचे आव्हान दिले होते. पण भारताला 237 धावाच करता आल्या.

ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी करताना उस्मान ख्वाजाने 100 धावांची शतकी खेळी केली, तर पिटर हँड्सकॉम्बने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्माने 56 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली सुरुवात केली होती. पण नंतर भारताने नियमित कालांतराने विकेट गमावल्याने भारताला 35 धावांनी विजयापासून दूर रहावे लागले.

रोहित बरोबरच केदार जाधव(44) आणि भुवनेश्वर कुमार(46) यांनी चांगला प्रतिकार केला होता. पण तेही भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

या मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत पुढील तीनही सामने जिंकून मालिकाही जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

त्यामुळे विश्वचषक तोंडावर आला असताना ऑस्ट्रेलियाने केलेल्या शानदार पुनरागमनाचे क्रिकेटजगतातून कौतुक होत आहे, तर भारताला मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जावे लागत आहे.

भारताची विश्वचषकाआधीची ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका होती. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

भारताच्या या पराभवानंतर अशा व्यक्त झाल्या सोशल मीडियावर भावना-

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियासह या तीन देशांनी केला आहे हा मोठा कारनामा

४१वे अर्धशतक करणाऱ्या रोहित शर्माने केली गांगुलीच्या ‘दादा’ विक्रमाची बरोबरी

‘सलामीवीर’ रोहित शर्माने या दिग्गजांच्या यादीत मिळवले अव्वल स्थान…