विराट, पंड्या, बुमराह…. नक्की सामनावीर पुरस्कार कुणाला?

नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मंगळवारी (21 आॅगस्ट) चौथ्या दिवसाखेर 9 बाद 311 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी 1 विकेटची तर इंग्लंडला 210 धावांची गरज आहे.

या सामन्यात कर्णधार कोहलीने पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात १०३ धावा करत एकुण २०० धावा केल्या आहेत.

हार्दिक पंड्याने पहिल्या डावात फलंदाजी करताना १८ तर दुसऱ्या डावात ५२ धावा अशा एकुण ७० धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीत इंग्लंडच्या पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात १ विकेट अशा एकुण ६ विकेट्स घेतल्या आहेत.

जसप्रित बुमराह पहिल्या डावात ० धावेवर बाद झाला असुन दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीला संधी मिळाली नाही. तर  गोलंदाजीत इंग्लंडच्या पहिल्या डावात २ तर दुसऱ्या डावात ५ विकेट अशा एकुण ७ विकेट्स घेतल्या आहेत.

सामन्याचा आज ५वा आणि शेवटचा दिवस असुन एक विकेट बाकी आहे.

या सामन्यात या तीनही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. कर्णधार एक तगडा फलंदाज म्हणुन पुढे आला आहे तर पंड्या एक अष्टपैलू आणि बुमराह एक पुर्णवेळ गोलंदाज असा भुमिकांमध्ये दिसले आहे.

त्यामुळे सामनावीर पुरस्कार नक्की कुणाला द्यायला हा मोठा प्रश्न असणार आहे. परंतु अनेक जाणकारांच्या मते हा पुरस्कार विराट कोहलीला मिळु शकतो. कारण ज्या प्रकारे विराटने पहिल्या आणि दुसऱ्या डावात फलंदाजी केली ती या देशातील एक मोठी खेळी होती.

त्याच्या याच खेळीमुळे गोलंदाजांना कोणतही दडपण न घेता गोलंदाजी करण्याच स्वातंत्र्य मिळालं.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम

केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी

सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?