विराट अनुष्काला इटलीत लग्न करण्याचा सल्ला कोणी दिला?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह सोहळा अखेर ११ डिसेंबरला पार पडला. त्यांचा विवाहसोहळा इटलीत कुटुंब आणि जवळच्या मित्र परिवाराच्या उपस्थित साजरा करण्यात आला.

विराट अनुष्काचा हा लग्न संभारंभ फक्त  जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थित झाला असल्याने त्यांना पत्रकार किंवा पापाराझी वगैरे लोकांचा त्रास झाला नाही. त्यामुळे हा संभारंभ शांततेत पार पडला.

विराट अनुष्काने इटलीत लग्न तर केले पण त्यांना इटलीत लग्न करण्याचा सल्ला अनुष्काचा मार्गदर्शक आदित्य चोप्राने दिला. खुद्द आदित्य आणि राणी मुखर्जीने तीन वर्षांपूर्वी इटलीतच लग्न केले होते.

सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे “विराट अनुष्काने इटलीत लग्न करावे ही आदित्य चोप्राची कल्पना होती. इथे लग्न केले तर पापाराझी वैगरे लोकांमुळे तमाशा होईल असा सल्ला त्यांनी दिला होता. “

सूत्रांच्या म्हणण्यानुसार चित्रपटसृष्टीतील फक्त आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जीला लग्नासाठी आमंत्रण होते, पण ते त्यांच्या मुलीमुळे जाऊ शकले नाही.

विराट आणि अनुष्का ही सेलेब्रेटी जोडी दोन रिसेप्शन देणार आहेत. २१ डिसेंबरला दिल्लीत तर २६ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन होणार आहे.