श्रीलंका दौरा: भारतीय संघाचा श्रीलंकेतील लंचमधील खास मेनू

आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका दौरा सुरु होत आहे. हा सामना गॉल मैदानावर होत आहे. खेळाबरोबरच या दौऱ्यात आपण भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटरवर काही हटके विडिओ पहिले आहेत.

आजकाल चाहत्यांना खेळाडूंच्या प्रेस कॉन्फरेन्सपासून ते त्यांच्या ब्रेकफास्ट किंवा लंच बद्दल बरेच विडिओ किंवा माहिती ही अधिकृत सोशल अकाउंट्सवरून मिळते. काल असाच एक खास विडिओ भारतीय संघाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

कोणत्याही दौऱ्याला प्रारंभ करण्यापूर्वी खेळाडूंच्या जेवणातील मेनूची यादी पाहुणा संघ यजमान संघाला आधीच पाठवत असतो. जेणेकरून त्याप्रमाणे त्याच नियोजन यजमान क्रिकेट बोर्ड करेल. ही पद्धत अगदी रणजी सामान्यांना देखील अवलंबली जाते.

विशेषतः परदेश दौऱ्यात तुम्हाला फक्त १५ खेळाडू बरोबर घेऊन जावे लागत असल्यामुळे अन्नातून कोणतीही बाधा होऊ नये तसेच खेळाडू आजारी पडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते. आजकाल खेळाडूसुद्धा आपल्या आहाराबद्दल विशेष काळजी घेताना दिसतात.

याचाच एक खास विडिओ जो काल शेअर करण्यात आला. पहिला सामना सुरु होण्यापूर्वी जेथे भारत सराव करत आहे तेथे हॉटेल ताज समुद्रमधून भारतीय संघासाठी खास जेवण मागवण्यात आले आहे. श्रीलंकेतील वातावरणाला अनुसरूनच हे जेवण बनवलं आहे. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर चिकन करी सारख्या पदार्थांचा समावेश आहे.

भारतीय संघातील उमेश यादव आणि विराट कोहली यांनी चिकन करी, हार्दिक पंड्या आणि वरिद्धिमान सहा यांनी डाळ आणि भात, रवींद्र जडेजा पारंपरिक श्रीलंकन सूप तर चेतेश्वर पुजारा नारळ पाणी पिताना या विडिओमध्ये दिसत आहे.