या कारणामुळे सिडनी कसोटीत भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बांधली हाताला काळी पट्टी

सिडनी। आजपासून भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 4 बाद 303 धावा केल्या आहेत.

या सामन्यात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उतरताना हाताच्या दंडाला काळी पट्टी बांधून आलेले दिसले.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी मुंबईत वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ भारतीय खेळाडूंनी आज हाताला काळी पट्टी बांधली होती.

आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघासाठी खेळलेले अनेक खेळाडू घडले आहेत. यात तेंडुलकर बरोबरच विनोद कांबळी, रमेश पोवार, अजित आगरकर, प्रविण आम्रे, संजय बांगर असे अशा मोठ्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज बिली वॉटसन यांचे 29 डिसेंबर 2018 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही हाताला काळी पट्टी बांधून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

वॉटसन यांनी ऑस्ट्रेलियाकडून 4 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत न्यू साउथ वेल्स संघासाठीही मोलाचे योगदान दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

एकाच षटकात या फलंदाजाने काढल्या ३४ धावा, केली डिविलियर्सच्या विक्रमाची बरोबरी

हेडन- सचिनला जे १० वर्षांपुर्वी जमल ते पुजाराने आता करुन दाखवलं

आता या दिग्गजांच्या यादीत पुजाराचे नाव गर्वाने घेतले जाणार