धोनीची २ वर्षीय मुलगी झिवा असणार या कार्यक्रमाची प्रमुख अतिथी !

माजी कॅप्टन कूल एमएस धोनीची मुलगी झिवा ही केवळ २ वर्षांची असूनही अनेक क्रिकेटप्रेमींना माहित आहे. झिवा सतत चर्चेत असणारी सेलेब्रिटी किड्सपैकी एक आहे.

कधी कर्णधार कोहलीने शेअर केलेल्या विडिओमुळे तर कधी फुटबॉल सामन्यावेळी धोनीला पाणी देतानाचे फोटो शेअर झाल्यामुळे झिवाचा कायमच चर्चेत असते.

झिवाचे स्वतःचे इंस्टाग्राम अकाउंट असून त्यावर तिला ५० हजारांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. त्यावर तिचे फोटो आणि विडिओ आपणास पाहायला मिळतात.

अशाच एका विडिओत झिवा १९९२ च्या अद्वयथम या मल्याळम चित्रपटातील गाणे म्हणताना दिसत आहे. तिची आया असणाऱ्या शीला या मल्याळम स्त्रीने तिला हे गाणं शिकवलं आहे.

हे तीच गाणं इतकं प्रसिद्ध झालं की अलाप्पुझा जिह्ल्यातील अलाप्पुझा श्री कृष्ण मंदिराने तिला कृष्ण जन्माष्टमीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे. हा कार्यक्रम १४ जानेवारी रोजी होणार आहे.

आता या आमंत्रणाचा धोनी परिवार स्वीकर करतोय की नाही हे लवकरच समजेल.

सध्या धोनी हा भारत विरुद्ध न्यूजीलँड मालिकेत व्यस्त आहे. भारत विरुद्ध न्यूजीलँड वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना उद्या कानपुर येथे होणार आहे.