रिशांक विक्रम करू शकतो तर मी का नाही? – रोहीत कुमार

प्रो कबड्डीमध्ये काल पुणे लेगच्या पहिल्या सामन्यात बेंगलूरु बुल्सने युपीचा ६४-२४ असा दारुण पराभव केला. सामन्यात हिरो ठरला तो विक्रमवीर रोहीत कुमार. रोहितने या सामन्यात तब्बल ३२ गुण मिळवण्याचा भीम पराक्रम केला. या ३२ गुणांपैकी ३० गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले. या उत्तम कामगिरीसोबत तो एका सामन्यात ट्रिपल सुपर टेन करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.

या भीम पराक्रमानंतर महा स्पोर्ट्सशी बोलताना त्याने मनमोकळेपणाने उत्तरे दिली. त्याची ही खास मुलखात…

या सामन्यात बेंगलूरु बुल्स संघाने खूप मोठा विजय मिळवला त्याबद्दल तू काय म्हणशील?
रोहित: या सामन्यातील विजय मोठा आहे. परंतु अशी कामगिरी अगोदरच्या काही सामन्यात झाली असती तर आम्ही प्ले ऑफसाठी पात्र ठरलो असतो. २०० गुणांचा टप्पा पार करणे माझ्यासाठी खास गोष्ट आहे.

तिसऱ्या मोसमात स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणे आणि आज ट्रिपल सुपर टेन करणे या दोन घटनांपैकी कोणती घटना जास्त जवळची वाटते?
रोहित: तिसऱ्या मोसमापासून मी प्रो कबड्डीमध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्या मोसमात मी पटणाकडुन खेळताना संघ विजेता झाला. या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळेल असे मला कधी वाटले देखील नव्हते. आजच्या सामन्यातील कामगिरी देखील जबरदस्त झाली. माझे पाय आज जमिनीवर नाहीत. या दोन्ही बाबी माझ्यासाठी स्वप्नवत आहेत.

रिशांकचा २८ गुंणाचा विक्रम तू सहा दिवसांच्या आतच मोडशील असे तुला वाटले होते का?
रोहित: काही तरी मोठा विक्रम आपलया नावावर सावा असे मला नेहमी वाटत होते. रिशांकच्या विक्रमाबाबत म्हणाल तर मला वाटत होते की जर तो हा विक्रम करू शकतो तर मी का नाही. त्यामुळे मी खूप साकारात्मक होतो. मोठा विक्रम नावावर झाल्यामुळे मी खूप समाधानी आहे.

या विक्रमी कामगिरी नंतर तू आता तुझा आवडता अभिनेता अक्षय कुमारला फोन लावणार काय?
रोहित: फोन नाही लावणार पण प्रो कबड्डीचे हे सत्र संपल्यावर त्यांना भेटण्यास त्यांच्या घरी जायचे आहे.

आजच्या कामगिरीनंतर तू भारतीय संघात निवडीसाठी तुझी दावेदारी मनबुत केली आहेस असे तुला वाटते का?
रोहित: भारतीय संघात निवड होणे यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी नसेल. भारतासाठी खेळण्याची संधी मिळणे ही खूप अभिमानाची बाब आहे. ही संधी मिळावी म्हणून मी खूप प्रयन्त करत आहे.

आजच्या सामन्यातील खेळ तू कोणाला समर्पित करतो?
रोहित: आजचा विक्रमी खेळ माझ्या वडिलांना आणि कोच यांना समर्पित करतो.