त्या कारणामुळे सौरव गांगुलीने केला टॅक्सीने प्रवास !

आज भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज पिवळ्या रंगाची टॅक्सी पकडून बीसीसीआय मीटिंगला हजेरी लावली. प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कोलकाता शहरात मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळणाऱ्या भारताच्या या कर्णधाराने असं करण्यामागे एक खास कारण आहे.

सौरव गांगुली शक्यतो आपल्या बीएमडब्लू कारने कोलकाता शहरात कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाणे पसंत करतो. परंतु आज एक्सआइड चौक येथे आज बीसीसीआयच्या तांत्रिक समितीच्या मीटिंगला जाताना ‘दादा’ ची गाडी खराब झाली. मीटिंगला आधीच उशीर झाल्यामुळे गांगुलीने पटकन एक पिवळी टॅक्सी पकडून मीटिंग जेथे आयोजित केली आहे ते हॉटेल गाठले.

याबद्दल बोलताना सौरव गांगुलीचा ड्राइवर म्हणाला, ” ली रोडवरील एक्सआइड चौक येथे गाडी खराब झाल्यामुळे दादा’नी पटकन पिवळी टॅक्सी पकडून हॉटेल गाठले. ”

गांगुली ह्या मीटिंगच अध्यक्षस्थान भूषविणार असल्यामुळे आणि एकूणच उशीर झाल्यामुळे ही मीटिंग काही काळ उशिराने झाली.