म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सिडनी कसोटीदरम्यान पिंक कॅप दिल्या ग्लेन मॅकग्राला

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचा आज(5 जानेवारी) तिसरा दिवस आहे.

आज या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही संघांनी स्वाक्षरी केलेल्या त्यांच्या गुलाबी टोप्या ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्राला दिल्या आहेत.

या टोप्यांचा लिलाव होऊन त्याचा नीधी हा स्नन कर्करोग जागरूकतेसाठी काम करणाऱ्या मॅकग्रा फाउंडेशनसाठी दिला जाणार आहे.

मॅकग्राची पत्नी जेन मॅकग्रा हीचे 2008 मध्ये स्तन कर्करोगाने निधन झाले होते. त्यामुळे तिच्या स्मरनार्थ 2009 पासून सिडनीमध्ये जानेवारी महिन्यात होणारा कसोटी सामना हा पिंक टेस्ट म्हणून ओळखला जातो. या दिवशी सिडनी मैदान गुलाबी रंगाने सजवण्यात येते. भारत ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेला हा सामना 11 वी पिंक टेस्ट आहे.

या सामन्याचा तिसरा दिवस हा पिंक डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्तन कर्करोगाच्या जागरूकतेसाठी निधी उभा करुन मॅकग्रा फाउंडेशनला दिला जातो. हे फाउंडेशन स्तन कर्करोगाच्या जागरूकतेबरोबरच ऑस्ट्रेलियामध्ये ब्रेस्ट केयर नर्स यांच्या शिक्षणासाठीही पाठिंबा देते. या दिवशी प्रेक्षकही गुलाबी रंगाची वस्त्र परिधान करुन येतात.

याबद्दल बोलताना मॅकग्रा म्हणाला, जेनला नक्कीच अभिमान वाटत असेल.

या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला आहे. भारताकडून चेतेश्वर पुजारा 193 आणि रिषभ पंतने नाबाद 159 धावांची शतकी, तर रविंद्र जडेजा 81 आणि मयंक अगरवालने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.

तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरु असून 51. 4 षटकात 152 धावांवर 4 विकेट गेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून या डावात मार्कस हॅरिसने 79 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

केएल राहुलचे मैदानातील ते कृत्य पाहून अंपायरलाही करावे लागले कौतुक, पहा व्हिडिओ

Video: जेव्हा ऑस्ट्रेलियन कर्णधार पत्रकार परिषदेत बोलतो पत्रकाराच्याच फोनवर…

टीम इंडियाचे टेंशन वाढले, वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात झाले या खेळाडूंचे पुनरागमन