आणि विराटने धरले सचिनचे पाय !

पुणे । भारतीय संघात जेव्हा विराट कोहलीची पहिल्यांदा निवड झाली तेव्हा त्याने पहिल्याच दिवशी सचिनच्या रूममध्ये जाऊन त्याचे पाय धरले होते. ही घटना स्वतः विराट कोहलीने गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पिअन्स या कार्यक्रमात सांगितली आहे.

विराटने यावेळी आपण सचिनला पहिल्यांदा भेटण्यासाठी दोन दिवस तयारी केली होती. विराटला यावेळी मोठ्या प्रमाणावर सचिनला भेटायची भीतीही वाटत होती. याबद्दल विराटने संघातील एक-दोन खेळाडूंना सांगितले होते.

त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंनी विराटची खेयचायची ठरवली आणि त्यासाठी एकी खास योजना आखली. त्यांनी विराटला सांगितले की ‘जो कुणी संघात नवीन येतो तो सचिनचे पाय धरतो आणि दर्शन घेतो’.

विराटला ही गोष्ट खरी वाटली आणि तो जेव्हा सचिनला भेटला तेव्हा खरोखर सचिनचे पाय धरले तेव्हा सचिन म्हणाला, ” काय करतोय हे. “

यावर विराट म्हणाला, ” पाजी मला संघातील खेळाडूंनी सांगितले आहे की भारतीय संघात नवीन आले की पहिले आपले दर्शन घ्यावे लागते. ” यावर सचिनने विराटचा गैरसमज दूर करत सांगितले की संघातील खेळाडू त्याची गंमत करत होते.