“शाब्बास लंबे” विराटचा आवाज स्टंप जवळील कॅमेऱ्यात रेकॉर्ड!

सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटचा शिव्या देण्याचा एक विडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला. यानंतर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आणखी एक विडिओ समोर आला आहे.

यावेळी विराट कोहली आणि इशांत शर्मा यांच्या दरम्यान झालेले एक छोटे संभाषण स्टंप माईकमधून सर्वांना ऐकू आले. या संभाषणात विराटने इशांतला “शाब्बास लंबे” असे म्हटले आहे.

या संभाषणादरम्यान विराटचा इशांत शर्मावरील विश्वास दिसून येत होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना विराट त्याच्या बरोबर १० व्या क्रमांकावर फलंदाजी करायला इशांतला म्हणाला “तू मोर्ने मॉर्केलचे दोन चेंडू खेळशील” (“तू २ बॉल खेलेगा इसकी”).

त्यावर इशांत शर्माने होकार देताना म्हटले ” हो खेळेल.” (“हां खेल लुंगा”). यावर पुन्हा विराटने खात्री करून घेण्यासाठी विचारले “तुला खात्री आहे?” आणि इशांतने त्याला “हो” सांगितले. इशांतचा आत्मविश्वास आणि होकार ऐकून विराट त्याला म्हणाला, “शाब्बास लंबे.”

या सामन्यात विराटने १५३ धावांची दीडशतकी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३०७ धावा केल्या आहेत.