भारत-वेस्ट इंडीज संघात आज होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्याबद्दल सर्वकाही…

पोर्ट ऑफ स्पेन। आज(11 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना होणार आहे. हा सामना क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर होणार आहे.

तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. पहिल्या सामन्यात केवळ 13 षटकांचा खेळ झाला होता. त्यामुळे आता दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यात कोणताही अडथळा येऊ नये अशी अपेक्षा करतील.

भारतीय संघाने या वनडे मालिकेआधी टी20 मालिकेत वेस्ट इंडीजला 3-0 अशा फरकाने पराभूत केल आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असेल. पण त्याचबरोबर वेस्ट इंडीजच्या संघात अनुभवी ख्रिस गेलचा समावेश झालेला असल्याने त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील.

पहिल्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाने युवा फलंदाज श्रेयस अय्यरला संधी दिली होती. तसेच केदार जाधव, कुलदीप यादव यांचाही 11 जणांच्या संघात समावेश केला होता. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यासाठीही त्यांना संधी मिळते का हे पहावे लागणार आहे.

या सामन्यातील हवामान कोरडे राहणार असून पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे आज पूर्ण सामना होऊ शकतो.

क्विन्स पार्क ओव्हल या मैदानावर आत्तापर्यंत भारत आणि वेस्ट इंडीज संघात 14 सामने झाले आहेत. यातील 6 सामने भारताने जिंकले आहेत. तर 7 सामने वेस्ट इंडीजने जिंकले आहेत. तसेच एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

याबरोबरच आत्तापर्यंत या दोन संघांमध्ये 128 वनडे सामने झाले आहेत. यातील 60 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर 62 सामन्यात वेस्ट इंडीजने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 2 सामने बरोबरीत सुटले आहेत आणि 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.

आज वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्याबद्दल सर्वकाही…

कधी होणार वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना?

-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना आज(11 ऑगस्ट) होणार आहे.

किती वाजता सुरु होणार वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना?

-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल.

कुठे होणार आहे वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना?

-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना क्विन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे होणार आहे.

कोणत्या चॅनेलवर पाहता येणार वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना?

-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना सोनी नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.

वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?

-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना सोनीलीव (SonyLIV) या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येईल.

यातून निवडले जातील 11 जणांचे संघ-

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

वेस्ट इंडीज – एव्हिन लुईस, ख्रिस गेल, शाय होप (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेयर, जेसन होल्डर (कर्णधार), रोस्टन चेस, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, शेल्डन कोटरल, ओशान थॉमस, जॉन कॅम्पबेल, फॅबियन ऍलन, केमार रोच.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने आयपीएलबद्दल केले मोठे भाष्य

सुरेश रैनाच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया; इतक्या दिवसांसाठी राहणार क्रिकेटपासून लांब

व्हिडिओ: विजय शंकरचे दुखापतीनंतर धमाकेदार पुनरागमन; पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट